मुंबई/पुणे

Chhatrapati Sambhaji Maharaj: छत्रपती संभाजीराजेंसंदर्भातील विकिपिडीयावरील आक्षेपार्ह मजकूर हटवा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

CM Fadnavis: छत्रपती संभाजी महाराजांबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकिपिडियावर आक्षेपार्ह उल्लेख असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

Bharat Jadhav

विकिपिडियावर छत्रपती संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह उल्लेख असल्याची बाब समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आक्रमक भुमिका घेतलीय. विकिपिडियावरील आक्षेपार्ह मजकूर हटवून द्यावा असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेत. छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबतचे आक्षेपार्ह मजकुराची दखल राज्य सरकारकडून घेण्यात आलीय. आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यावर कारवाई करणार असं, मंत्री संजय शिरसाट यांनी माहिती दिलीय.

देवेंद्र फडणवीस यांनी सायबर सेलचे आयजी यशस्वी यादव यांना तातडीने मंत्रालयात बोलवून घेत विकिपिडीयावरील मजकूर हटवण्याचे आदेश दिलेत. विकिपीडियाशी संपर्क करून छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातील वादग्रस्त मजकूर काढून टाकावेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. त्यांच्याबद्दल असे लेखन खपवून घेतलं जाणार नसल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत.

दरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी विकिपीडियावर प्रकाशित करण्यात आलेला अपमान जनक मजकूर त्वरित काढून घेण्यात यावा या मागणीसाठी आज पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती प्रतिष्ठानने पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना भेटून निवेदन दिलं. तसेच ज्या कुणी व्यक्तीने छत्रपती संभाजी महाराज विषयी विकिपीडियावर अपमान जनक मजकूर प्रकाशित केला त्याच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

SCROLL FOR NEXT