लालबागच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठापणा पूजेस विलंब... Saam Tv News
मुंबई/पुणे

लालबागच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठापणा पूजेस विलंब...

मुंबई पोलिस आणि लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांच्यात गेली ३० मिनटं चर्चा सुरू आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: लालबागच्या राजाची स्थापना करणारे स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांना पोलिसांनी नोटीस पाठवून त्यांची दुकानं बंद केली आहेत. त्यामुळे लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी प्रचंड नाराज आहेत. मुंबई पोलिस आणि लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांच्यात गेली ३० मिनटं चर्चा सुरू आहे.

हे देखील पहा -

लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनाला पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे बाहेरून कोणी भाविक लालबागमध्ये येणार नाही हे स्पष्ट आहे. मग स्थानिक रहिवाश्यांची दुकानं का बंद करण्यात आलीत? असा प्रश्नं लालबाग मार्केटमधील रहिवाशी विचारत आहेत. मुंबई पोलिसांच्या सुरक्षा कारणास्तव लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी त्रस्तं आहेत. त्यांना त्यांच्याच घरी येण्या-जाण्यासाठी पोलिसांकडून अटकाव करण्यात येतोय.

त्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही स्थानिक रहिवाशांच्या मागणीवर ठाम रहात पोलिसांशी मागण्यांवर चर्चा सूरू केलीय. त्यामुळे लालबागचा राजाच्या प्राणप्रतिष्ठापनेस विलंब होतोय.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपचे खासदार धनंजय महाडिक सहपरिवार आमदार सतेज पाटील यांच्या भेटीला

Mumbai : मुंबई हादरली! शाळा सुटल्यावर मुलीला दुचाकीवर बसवले, निर्जनस्थळी नेऊन हात-पाय बांधून लैंगिक अत्याचार

मोठी बातमी! शरद पवारांचे खासदार मोदींची भेट घेणार, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Cancer cases increasing: कॅन्सरचे रुग्ण दिवसेंदिवस का वाढत आहेत? डॉक्टरांनी सांगितली 5 मोठी आणि धक्कादायक कारणं

NEET पेपर २०२६ कसा फुटला? NTA च्या तज्ज्ञांनीच रचला कट; A to Z टाइमलाईन समोर

SCROLL FOR NEXT