कराड : राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी त्यांच्या कराड (Karad) येथील मंगळवार पेठेतील जुन्या घरात गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली यावेळी त्यांनी कराडमधील मंगळवार पेठेतील कुंभारवाड्यातून त्यांनी स्वतः गणेशाची मूर्ती आणली आणि सहकुटुंब गणेश मूर्तीची साध्या पद्धतीने प्राणप्रतिष्ठापना केली.(Celebrate Ganeshotsav by following the instructions of government)
हे देखील पहा-
गेल्या वर्षीच्या आणि यावर्षी्च्या गेणेशोत्सावरती कोरोनाचे (Corona) सावट आहेच मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावेळी संसर्ग कमी आहे. त्यामुळे आपण हा उत्सव साजरा करत आहोत तरिही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन (Corona rules) करुन शांततेने आणि धार्मिक भावनेने हा गेणेशोत्सव साजरा करुया असं आवाहन बाळासाहेब पाटील यांनी कराडवासियांना केलं आहे तसेच सर्व महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी गेणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.
कोरोनाच्या संकटात गणेशोत्सव साजरा होत असुन नागरिकांनी सर्वांनी मिळून शांततेन आणि धार्मिक भावनेने सरकारच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा करावा असे ही मंत्री पाटील यावेळी म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.