Deepak Kesarkar Saam
मुंबई/पुणे

विरोधकांच्या घोषणाबाजीवर केसरकरांचा आक्रमक पवित्रा; म्हणाले, ५० खोके सोडा, ५० रुपये जरी...

अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी सत्ताधारी विशेषत: शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे.

सुरज सावंत

मुंबई: राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे, शिंदे सरकारमधील मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून विरोधकांनी सत्ताधारी विशेषत: शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे. (Monsoon session)

यावेळी शिंदे गटाला टार्गेट करत ५० खोके एकदम ओके, फिप्टी फिप्टी चलो गुवाहाटी, 'ईडी सरकार' अशा घोषणा द्यायला सुरुवात केली आहे. अजूनही विरोधक विधान भवनाच्या पायऱ्यांवरती अशी घोषणाबाजी करताना दिसतात. या घोषणांचे पडसाद सभागृहामध्ये देखील पाहायला मिळाले.

पाहा व्हिडीओ -

याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे प्रवक्त दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी विरोधकांच्या या घोषणाबाजीला प्रत्युत्तर दिलं आहे. ५० खोके सोडा, ५० रुपये जरी दिले असतील ना तर मी राजीनामा देईन असं वक्तव्य केसरकर यांनी केलं आहे.

माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले, 'पायऱ्यांवर बसून ज्या काही घोषणा दिल्या जातात, ५० खोके काय ५० रुपये जरी घेतले असले तरी मी पदाचा राजीनामा देईन, फक्त आम्ही पैसे घेतलेलं त्यांनी सिद्ध करावं. आम्ही तत्वासाठी भांडलो, तत्त्वासाठी भांडण आणि त्यांना डिवचंण याबाबत काहीच शंका नाही. सत्ता गेल्याने विरोधकांना दुःख झालं आहे, पण वाईट वाटताना दुसऱ्याला किती बदनाम करायचं यालासुद्धा मर्यादा असतात. आपण पायऱ्यांवर बसला कधीही आक्षेप घेतला नाही असं केसरकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, 'उद्धव ठाकरेंप्रमाणे, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विषयीही मी बोलणार नाही, शिवसेना बांधण्यातही राज ठाकरे यांचा मोठा वाटा आहे. राज ठाकरे हिंदुत्वाच्या मार्गावर चालत आहेत ही चांगली गोष्ट आहे. जे हिंदुत्व सोडून वेगळ्या विचारांसोबत जात आहेत त्यांनी हे लक्षात घ्यायल हवं असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) नाव न घेता लगावला.

शिवाय शिवसेना (Shivsena) कोणाच्या दावणीला बांधण्याच प्रयत्न करत असतील तर ते बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीही सहन करणार नाही. सत्तेसाठी कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचंही केसरकर यावेळी म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

US Presidential Election Result: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल, आतापर्यंत १९८ मतं; कमला हॅरीस यांना किती मतं?

Maharashtra Politics: नवाब मलिक रिंगणात, महायुतीत वाद; भाजप प्रचार करणार नाही, आशिष शेलारांचं वक्तव्य

Sanam Kapoor Story: गडगंज पगाराच्या नोकरीला रामराम, १२० स्क्वेअरफूटमध्ये सुरुवात, आता हजारो कोटींचा मालक, सक्सेस स्टोरी वाचाच

Sharad Pawar News: शरद पवारांचे अजित पवारांबाबत मोठे वक्तव्य; काकांकडून पुतण्याच्या कौतुकाचं गूढ काय?

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत भाजपकडून ४० जणांची हकालपट्टी, बंडखोरांना दाखवला घरचा रस्ता!

SCROLL FOR NEXT