Deepak Kesarkar Saam TV
मुंबई/पुणे

Deepak Kesarkar : उष्माघात फक्त नागपूरसारख्या ठिकाणी होतो, मुंबईत नाही; महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्देवी घटनेवर केसरकरांची प्रतिक्रिया

Deepak Kesarkar : माझी विनंती आहे की कुठल्याही विषयाचा राजकारण करू नये, असं आवाहनही दीपक केसरकर यांनी केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

भूषण शिंदे

Deepak Kesarkar : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्दैवी घटनेत 13 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उष्माघात हा नागपूरसारख्या ठिकाणी होतो. मुंबईत उष्माघात होत नाही, कारण हवेत आर्द्रता असते, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

तुम्ही रेकॉर्ड चेक करा की आपल्या इथे  उष्माघातने मृत्यू झाला आहे का? बेशुद्ध हौपर्यंत लोक सहन करतात ही सहनशिलात मारक ठरते. ज्यावेळी एवढी मोठी गर्दी जमते त्यावेळी नैसर्गिक आपत्ती आली तर कंट्रोल करणे अवघड असू शकते. माझी विनंती आहे की कुठल्याही विषयाचा राजकारण करू नये, असं आवाहनही दीपक केसरकर यांनी केलं आहे.

श्री सदस्य यांनी रात्री घरी जायला उशीर होईल म्हणून कार्यक्रम दुपारी ठेवावा अशी विनंती केली होती. जरी रात्री कार्यक्रम ठेवला तरी श्री सदस्य सकाळपासून येऊन बसले असते. आम्हाला त्यांच्या भावनांचा विचार करावा लागला. त्यामुळे जे लोक यातून राजकारण करत आहेत ते चुकीचे आहे. (Latest News Update)

आप्पासाहेब धर्माधिकारी हे महाराष्ट्राचे अभिमान आहेत. त्याशिवाय लाखो लोक जमत नाहीत. त्याठिकाणी 350 डॉक्टर आणि नर्सेस होते. काही लोक म्हणतात की सरकार बेफिकीर आहे असं म्हणणं योग्य नाही, असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे हादरले! भरवस्तीतून १८ वर्षांच्या तरुणीला उचलून नेहण्याचा प्रयत्न; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Maharashtra News Live Update: नागपूर विमानतळावर महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानाची नागरिकांना मारहाण

Weather : आंध्रच्या किनाऱ्याला धडकणार चक्रीवादळ, महाराष्ट्रातील 'या' भागात धो-धो पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा नवा इशारा

Monday Horoscope : नवीन जबाबदाऱ्या मिळतील! ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

SCROLL FOR NEXT