Deccan Queen 94th Birthday Saam Tv
मुंबई/पुणे

Deccan Queen 94th Birthday: डेक्कन क्वीन झाली 94 वर्षांची; पुणे रेल्वे स्थानकात वाढदिवस साजरा

Pune-Mumbai Deccan Queen Celebrates 94 years: पुणे रेल्वे स्टेशन येथे केक कापून डेक्कन क्वीनचा

Dnyaneshwar Choutmal

Deccan Queen Birthday: मुंबई आणि पुणेकरांची लाडकी डेक्कन क्वीन या रेल्वेला ९३ वर्षे पूर्ण झाली आहे. आज १ जूनला या रेल्वेचा ९४ वाढदिवस आहे.तुतारी वाजवून डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांनतर पुणे रेल्वे स्टेशन येथे केक कापण्यात आला.

तसेच इंजिनचे पूजन करण्यात आले. या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटीलही (Chandrkant Patil) उपस्थित होते. क्कन क्वीनला फुलांनी आणि फुगे लावून सजवण्यातही आलं होतं. डेक्कन क्वीनचा वाढदिवस सोहळा पार पडत असताना पुणे रेल्वे स्थानकात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. (Latest Marathi News)

दख्खनची राणी का म्हटले जाते?

महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांत १ जून १९३० ला ‘डेक्कन क्वीन’ ची सुरवात झाली. मध्य रेल्वेचा अग्रदूत असलेल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. या प्रदेशातील दोन महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी रेल्वे दाखल करण्यात आली होती. ही पहिली डिलक्स ट्रेन होती आणि तिला पुण्याचे (Pune) नाव देण्यात आले होते. ज्याला ‘दख्खनची राणी’ असेही म्हटले जाते. (Pune News)

डेक्कन क्वीन ट्रेनची विशेष वैशिष्टे

जुन्या रेकमधील 5 फर्स्ट क्लास चेअर कारच्या जागी 5 एसी चेअर कारमध्ये बदलण्यात आले, ज्यामुळे धूळमुक्त वातावरणात 65 अतिरिक्त आसन क्षमता आहे. तसेच 9 - द्वितीय श्रेणीच्या चेअर कार जुन्या डब्यांच्या तुलनेत 120 आसनांची अतिरिक्त आसन क्षमता आहे.

अशा प्रकारे, जुन्या रेकमध्ये 1232 जागांच्या तुलनेत नवीन रेकमध्ये एकूण 1417 आसनक्षमता केली आहे, म्हणजेच 15% ने वाढ झाली आहे. डायनिंग कार 32 प्रवाशांसाठी टेबल सेवा आणि मायक्रोवेव्ह ओव्हन, डीप फ्रीझर आणि टोस्टर यांसारख्या आधुनिक पॅन्ट्री सुविधा आहेत. डायनिंग कार देखील कुशनच्या खुर्च्या आणि कार्पेटने सुसज्ज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - जायकवाडीच्या नाथसागरात जलपूजन; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन

Railway Ticket Clerk : प्रवाशांची तिकिटासाठी मोठी रांग, तरीही बुकिंग क्लर्क फोनवर बिझी; संताप आणणारा व्हिडिओ

World Lung Cancer Day 2025: फुफ्फुसाचा कर्करोग झाल्यास सुरूवातीला काय लक्षणं दिसतात? वेळीच व्हा सावध

Konkan Railway: ट्रेनमधून कार कोकणात न्यायचीय? कसं कराल बुकिंग, किती लागेल शुल्क? जाणून घ्या सर्व काही

Income Tax Return: करदात्यांसाठी आनंदाची बातमी! आता आयटीआरचा परतावा काही तासांत येणार

SCROLL FOR NEXT