Mumbai Local Train Update Saam tv
मुंबई/पुणे

Local Train : लोकल अपघातात १५ वर्षांत ४५००० जणांचा मृत्यू, रेल्वेची हायकोर्टात माहिती

Bombay High Court : मुंबई उपनगरीय रेल्वेमुळे होणाऱ्या अपघाताचा मृत्यूदर हे 38.08 टक्के इतका आहे. हा मृत्यूदर जगातील सर्वाधिक मोठा असल्यानं ती एक लज्जास्पद बाब असल्याचे ताशेरे हायकोर्टानं ओढले.

Namdeo Kumbhar

Mumbai Local News : मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान लोकलमधील गर्दीमुळे अनेक अपघात होतात. त्यामध्ये कुणी जखणी होतं, तर कुणाचा मृत्यू होतोय. या वाढत्या अपघाताची आणि मृत्यूची नोंद मुंबई हायकोर्टानं बुधवारी गंभीर दखल घेतली. मुंबई उपनगरीय रेल्वेमुळे होणाऱ्या अपघाताचा मृत्यूदर हे 38.08 टक्के इतका आहे. हा मृत्यूदर जगातील सर्वाधिक मोठा असल्यानं ती एक लज्जास्पद बाब असल्याचे ताशेरे हायकोर्टानं ओढले. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून मुंबई हायकोर्टात मागील १५ वर्षांत रेल्वे अपघातात ४५ हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या मृत्यूसंदर्भात यतीन जाधव यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यामध्ये कोर्टाने रेल्वेला खडेबोल सुनावले. रेल्वेकडून कोर्टात मागील १५ वर्षांतील महिती देण्यात आली. त्याशिवाय इतर देशांचा मृत्यूतर आणि मुंबईतील मृत्यूदर यावर तुलना करण्यात आली. पण कोर्टाकडून रेल्वेला खडे बोल सुनावण्यात आलेत.

मध्य रेल्वेकडून (सीसीआर) 2009 ते जून 2024 पर्यंत उपनगरीय रेल्वे (लोकल ट्रेन) प्रणालीमध्ये एकूण 29,321 लोकांनी जीव गमावल्याचे सांगण्यात आलेय. मृत्यूच्या कारणांमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना, रेल्वेतून पडून अथवा रेल्वेच्या खाबांना आदळून झालेल्या घटनांची नोंद आहे.. दुसरीकडे, वेस्टर्न रेल्वेमध्ये (डब्ल्यूआर) 2009 ते 2023 पर्यंत 16,475 जणांचा मृत्यू झालाय. त्याशिवाय 2005 ते 2008 यादरम्यान पश्चिम रेल्वेवर 6,552 जणांचा मृत्यू झालाय.

पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेतून प्रवाशांच्या संख्येत गेल्या काही वर्षात 85 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे अपघाताच्या प्रकरणातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रवासी मोठ्या संख्येनं असल्याची सबब पुढे करून रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही. ज्या पद्धतीनं मुंबईकर प्रवास करतात ते लज्जास्पद असल्याची टीपण्णी करत मुंबई हायकोर्टानं रेल्वे प्रशासनाला फटकारले.

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने गेल्या आठवड्यात आपल्या उत्तराचा आराखडा कोर्टात सांगितला होता. रोहन शाह आणि सुरभी प्रभुदेसाई यांनी इतरने जगाच्या दुसऱ्या उपनगरीय रेल्वेमध्ये मृत्यूदर उच्च असल्याचा तर्क केला होता. यावर कोर्टाने रेल्वेला झापले, आपल्या देशातूल मृत्यू पाहा.. जून महिन्यात किती जणांनी प्राण गमावले... असा सवाल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : वर्ध्यामध्ये शेतात संत्र्यांचा पडला सडा, ढगफुटी सदृश्य पावसामुळे अतोनात नुकसान

Mumbai Rain: महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे गेला जीव, भांडुपमध्ये विजेच्या धक्क्याने १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; थरारक VIDEO

Soft Thepla: मऊ आणि स्वादिष्ट थेपले कसे बनवायचे? सोप्या आणि महत्त्वाच्या ट्रिक्स

Ladki Bahin : धक्कादायक! जिल्हा परिषदेच्या 1183 कर्मचाऱ्यांनीही घेतले लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये!

आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

SCROLL FOR NEXT