H3N2 Outbreak saam tv
मुंबई/पुणे

H3N2 Update News: पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 धोका वाढला, एका रुग्णाचा मृत्यू; शहरात सध्या 17 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरात सध्या जवळपास H3N2 व्हायरस बाधित 17 रुग्ण आहे.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad News : कोरोनासोबतच राज्यात H3N2 व्हायरसचा धोका वाढत आहे. अशातच पिंपरी चिंचवडकरांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वृद्ध महिलेचा H3N2 व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. (Pune News)

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना एका 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या महिलेला अनेक दुर्धर आजार होते, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य विभागाने दिली आहे. (Latest Marathi News)

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना एका 80 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या महिलेला अनेक दुर्धर आजार होते, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य विभागाने दिली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात बारा दिवसात H3N2 व्हायरसचा हा दुसरा बळी ठरला आहे. पिंपरी चिंचवड शहरात सध्या जवळपास H3N2 व्हायरस बाधित 17 रुग्ण आहे. मात्र दिलासादायक बातमी अशी आहे की फक्त एका रुग्णावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तर उर्वरित रुग्ण आहे आपल्या घरात विलगिकरण करुन उपचार घेत आहेत.

मुंबईतही H3N2 आणि H1N1 धोका वाढला

मुंबईतही H3N2 आणि H1N1 च्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक एच३एन२ च्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत पालिकेच्या रुग्णालयात १४ रुग्ण दाखल आहेत. त्यात ९ रुग्ण 'एच३ एन२'चे तर ५ रुग्ण 'एच१ एन१'चे आहेत.

मुंबईत आतापर्यंत एच१एच १च्या ११२ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी निम्मे रुग्ण हे एकट्या मार्च महिन्यात आढळले आहे. पालिकेच्या अहवालानुसार ए, डी, एफ दक्षिण, जी दक्षिण हे चार हॉटस्पॉट आहेत. शहरात दोन्ही आजारांचे रुग्ण वाढत असले तरी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची पालिकेने माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT