Rohit Guleria Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : पुण्यात ट्रेकसाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; मित्राला फोन करुन सगळी परिस्थिती सांगितली, पण...

रोहित गुलेरिया असं 32 वर्षीय ट्रेकरचं नाव आहे.

Prachee kulkarni

पुणे : पुण्यातील सिंदोळा किल्ल्यावर ट्रेकसाठी गेलेल्या तरुणाचा रस्ता चुकल्याने कड्यावरुन पडून दुदैवी मृत्यू झाला आहे. तीन दिवस बेपत्ता असलेल्या ट्रेकरचा शोध घेतल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याच निष्पन्न झालं. रोहित गुलेरिया असं 32 वर्षीय ट्रेकरचं नाव आहे.

रोहित मुळचा पठाणकोट पंजाब येथील रहिवाशी होता, पण सध्या नोकरीनिमित्त मुंबईत राहत होता. रोहित रविवारी (12 फेब्रुवारी) जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटाजवळील सिंदोळा या किल्ल्यावर एकटाच ट्रेकसाठी गेला होता.मात्र ट्रेकिंगदरम्यान रस्ता चुकल्याने तिथेच भरकटला.

किल्ल्याच्या एका अवघड ठिकाणी आल्यावर त्याने मुंबईतील मित्राला फोन केला. मी सिंदोळा किल्ल्यावर फसलोय, मी रस्ता चुकलो असून मला खाली किंवा वरही जाता येत नाही. रोहितने मित्राला लोकेशन देखील सेंड केलं होतं.

मात्र त्यानंतर रोहितचं आणि त्या मित्राचा काहीच संपर्क झाला नाही. मित्राने रोहितच्या वडिलांना फोन करुन याबाबतची माहिती दिली. सोमवारी व मंगळवारी देखील रोहितला फोन केल्यानंतर फोन उचलला गेला नसल्याने महाराष्ट्र माऊंटनेरिंग रेस्क्यु टीमची मदत घेण्याची निर्णय त्यांनी घेतला.

त्यानंतर दोन टीम करून रोहितचा शोध घेण्यासाठी किल्ल्यावर पाठवल्या गेल्या. त्यातील एका टीमला किल्ल्यावरून रोहितचा मृतदेह हा किल्ल्याच्या उत्तर दिशेला खाली एका कड्यावर दिसला.त्यानंतर जुन्नर रेस्क्यु टीमने पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान अवघड वाटेतून खाली आणला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

Asia Cup Hockey 2025 : टीम इंडियाने चौथ्यांदा कोरलं आशिया कपवर नाव; अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला धूळ चारली

SCROLL FOR NEXT