Pune News Saam Tv News
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यातील कॅफेतला धक्कादायक प्रकार, चॉकलेटच्या नावाखाली दिलं 'उंदीर शेक'

Chocolate shake food contamination found rat: एका कॅफेमध्ये चॉकलेट शेखच्या नावाखाली उंदीर शेख दिल्याचा घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार घडला आहे. हा प्रकार पुण्यातील कॅफेमध्ये घडला आहे.

Bhagyashree Kamble

एका कॅफेमध्ये चॉकलेट शेखच्या नावाखाली 'उंदीर शेख' दिल्याचा घाणेरडा आणि किळसवाणा प्रकार घडला आहे. पुण्यातील लोहगाव येथील एका कॅफेमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. व्हेलेंटाईन डे निमित्ताने दोन विद्यार्थ्यांनी फुड अॅपवरूवन चॉकलेट शेक ऑर्डर केला होता. मात्र, शेकमध्ये मृत उंदीर पाहून त्यांना धक्काच बसला. विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत रूग्णालयात धाव घेतली.

चॉकलेट शेखमध्ये उंदीर

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातीस लोहगावमधील दोन विद्यार्थ्यांना चॉकलेट शेख पिण्याची इच्छा झाली. त्यांनी व्हेलेंटाईन डेच्या दिवशी ऑनलाइन फुड अॅपद्वारे चॉकलेट शेख ऑर्डर केली होती. काही वेळातच डिलिव्हरी बॉय चॉकलेट शेख घेऊन आला. त्यातील २१ वर्षीय विद्यार्थी ते चॉकलेट शेख प्यायला.

तो संपूर्ण शेख प्यायला. नंतर त्याला ग्लासच्या तळाशी उंदीर आढळला. यानंतर मुलगा घाबरला. तातडीने विद्यार्थ्याने रूग्णालयात धाव घेतली. दवाखान्यात जात त्याने डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली. तरूणाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेत त्याने तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंदीर चुकून मिक्सरमध्ये पडला असावा. कॅफेमधील कर्मचाऱ्यांचं लक्ष नसल्यामुळे शेक तसंच पार्सल करण्यात आलं असावं, असा अंदाज व्यक्त केला जातोय. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devgad Waterfall : पाऊस, कोकण अन् धो धो कोसळणारा धबधबा, देवगडजवळ लपलंय 'हे' सुंदर ठिकाण

मला फरफटत नेलं, त्यातील दोन पोलीस कानात सांगत होते, हे सरकार..; राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट, एकच खळबळ

Jalgaon Crime: जमिनीच्या वादातून पुतण्याने घेतला काकाचा जीव, काठीने डोक्यावर हल्ला करत जागीच संपवलं

Fenugreek Seeds: सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मेथीदाणे खा; ५ समस्यांपासून मिळेल आराम

Shevgyachya Panacha Chaha : शेवग्याच्या पानांचा चहा कधी प्यायलात का? मधुमेहापासून ते ॲसिडीटीपर्यंत, फायदे वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT