डीसीपी मॅडमला हवीय फुकट मटण बिर्याणी! ऑडिओ क्लिप व्हायरल (पहा व्हिडिओ) Saam Tv
मुंबई/पुणे

डीसीपी मॅडमला हवीय फुकट मटण बिर्याणी! ऑडिओ क्लिप व्हायरल (पहा व्हिडिओ)

डीसीपी मॅडमच्या या कारनाम्याला कंटाळून कर्मचाऱ्याने थेट पोलीस महासंचालकांनाच एक पत्र लिहिले आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे - सध्या सोशल Social Media मीडियावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे फोनवरील संवाद चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. इतकेच नाही तर पुण्यातील डीसीपी मॅडमला Pune DCP मटण बिर्याणी Biryani हवी आहे आणि तेही फुकट. मॅडमला फुकट बिर्याणी हवी असल्याचा ऑडिओ आणि त्यांची ही फर्माईश सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. डीसीपी मॅडमच्या या कारनाम्याला कंटाळून कर्मचाऱ्याने थेट पोलीस महासंचालकांनाच एक पत्र लिहिले आहे.

जवळपास 5 मिनिटाची ही ऑडिओ क्लिप आहे. त्यात डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि नॉन व्हेजची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहेत आणि मॅडमला हे सगळे एका चांगल्या हॉटेलमधून हवे आहे. मटण बिर्याणी, प्रॉन्स हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नकोत. त्याचबरोबर हे पदार्थ चविष्ट देखील असावे असा मॅडमचा हट्ट आहे.

इतकेच नाही तर डीसीपी मॅडम आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे असा सवालही केला आहे. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचे सांगतांना दिसून येत आहे. अशावेळी मॅडम त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी सांगत असल्याचे या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे. मॅडमच्या अश्या वागण्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याची भलतीच पंचाईत झाल्याचं दिसून येत आहे.

Edited BY - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT