अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घरावर मुंबई महानगर पालिकेकडून बुलडोझर फिरवण्यात येत आहे. भेंडीबाजार परिसरातील पाकमोडिया लेन येथील 'हाजी इस्माईल हबीब मुसाफिरखाना' या इमारतीमध्ये दाऊद इम्राहिमचे वडिलोपार्जित घर आहे. या इमारतीच्या पाडकामाला आज सकाळपासून सुरूवात झाली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त घटनास्तळी तैनात करण्यात आला आहे.
मुसाफिरखाना परिसरात २५० पेक्षा जास्त पोलिस बंदोबस्त तैना केल्याचे पाहायला मिळत आहे. मुसाफिरखाना इमारतीवर पालिकेकडून हातोडा चालवला जात असून या कारवाईकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ही इमारत ८० वर्षे जुनी असून जीर्ण झाली होती. या इमारतीचे छत आणि भिंत देखील कोसळली होती. त्यामुळे या इमारतीला मुंबई महानगर पालिकेकडून धोकादायक असल्याचे घोषित करण्यात आले होते. दाऊद इम्राहिमचं घर असलेल्या या इमारतीवर १७ नोव्हेंबरलाच कारवाई होणार होती. पण काही कायदेशीर अडचणींमुळे कारवाई पुढे ढकलण्यात आली होती.
बुधवारी मुंबई महानगर पालिकेमध्ये ही इमारत पाडण्यासंदर्भात बैठकांवर बैठका पार पडल्या. त्यानंतर पालिकेने या कारवाईची तयारी पूर्ण केली आणि आज पोलिसांच्या कडक बंदोबस्तात ही इमारत बुलडोझरच्या सहाय्याने पाडली जात आहे. सकाळपासूनच या परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. मुसाफिरखाना येथील मशिदीच्या तोडक कारवाईला स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.
१९८६ मध्ये भारतातून पलायन करण्यापूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचे कुटुंब मुसाफिरखाना या इमारतीत राहत होते. दाऊदचा जन्मही याच इमारतीमध्ये झाल्याचे सांगितले जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही इमारत रिकामी होती. या इमारतीमध्ये दाऊदचे घर आणि ऑफिस होते. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांचा कट याच ऑफिसमधून रचला गेल्याचे सांगितले जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.