Pune Shivshahi Bus case Dattatraya Ramdas Gade  
मुंबई/पुणे

Pune Crime : शिवशाहीमध्ये तरूणीवर बलात्कार, आरोपी दत्ता गाडेची संपूर्ण कुंडली

Pune Shivshahi Bus case Dattatraya Ramdas Gade : २५ फेब्रुवारी रोजी दत्ता गाडे या सराईत गुन्हेगाराने २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार केला. शिवशाहीमध्ये त्याने डाव साधला, त्यानंतर पुण्यात एकच संतापाची लाट उसळली. दत्ता गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गुन्ह्याची नोंद आहे.

Namdeo Kumbhar

Pune Shivshahi Bus case : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये नराधम दत्ता गाडे यांने २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार केला. साडेपाच वाजता शिवशाही बसमध्ये त्याने डाव साधला, बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरले. नागरिकांमध्ये एकच संतापाची लाट पसरली. दत्ता गाडे याचा शोध घेण्यासाठी आठ पथके कार्यरत झाली आहे. ३६ वर्षीय दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हे असल्याचे पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. पुणे पोलिस बुधवारी दत्ता गाडे याच्या घरी दाखल झाले होते, तरूणीवर अत्याचार केल्यानंतर दत्ता गाडे घरी गेल्याचे तपासात उघड झाले. त्याचे बूट आणि कपडे पोलिसांना दिसून आले.

स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहे. दत्ता गाडे याच्यावर शिरूर, शिक्रापूर, अहिल्यानगर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडण्याचे गुन्हे त्यावर दाखल आहेत. २०२१ मध्ये कर्ज काढून घेतलेल्या एका चारचाकी ने तो पुणे अहिल्यानगर मार्गावर प्रवासी वाहतूक करत होता. यावेळी त्याने अनेक महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांना लुटलं आहे. दत्ता गाडे याच्या घरची परिस्थिती बेताची असून त्याला आई वडील, पत्नी, २ मुले आणि एक भाऊ आहे. पोलिसांनी भाऊ, पत्नी आणि आई यांचा जबाब नोंदवला आहे.

पुण्यात संतापाची लाट -

स्वारगेट डेपोमध्ये तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर पुण्यामध्ये संतापाची लाट उसळली. बुधवारी संध्याकाळी ठाकरे गटाने उग्र आंदोलन केले. आज स्वारगेट डेपो मध्ये प्रशासनाविरोधात अनेक आंदोलनं होणार आहेत. वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच अनेक संघटनांकडून या ठिकाणी आंदोलनं होणार आहे. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वसंत मोरे यांनी आंदोलन करून सुरक्षा रक्षक कक्षाची तोडफोड केली होती.

स्वारगेट प्रकरणाची सीआयडी चौकशी करा, सचिन खरात यांची मागणी

पुणे शहरात स्वारगेट बस स्थानक मध्ये बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना अत्यंत गंभीर आहे, पुणे शहराची ओळख ही शिक्षणाचे माहेरघर माहेर घर आहे आणि पुणे शहरांमध्ये जर अशा घटना घडत असतील तर हे अतिशय धक्कादायक आहे, त्यामुळे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रिपब्लिकन पार्टी आपल्या खरात पक्ष मागणी करत आहे. या प्रकरणाची तात्काळ सीआयडी चौकशी करून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करून आरोपीला तात्काळ अटक करा, अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blouse Colors Slim Arms: ब्लाऊज घातल्यावर दंड जाड दिसतो? या रंगाचे ब्लाऊज वापरा, दंड दिसेल एकदम स्लिम

Hairstyle Ideas: स्वानंदीच्या या ९ हेअरस्टाईल तुम्ही करा ट्राय; प्रत्येक लूकवर दिसतील एकदम परफेक्ट

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

Pune : पुण्यात शरद पवारांना जोरदार धक्का, विश्वासू शिलेदार राजकारणातून निवृत्त

Cancer symptoms risk: कधीही कळून येत नाहीत अशी लक्षणं, वाटतात साधी, पण असतात गंभीर; असू शकतो कॅन्सरचा धोका

SCROLL FOR NEXT