Shivsena Dasara Melava 2022
Shivsena Dasara Melava 2022 Saam TV
मुंबई/पुणे

Dasara Melava | शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आम्हीच करणार; ठाकरे गट लागला कामाला

Jagdish Patil

निवृत्ती बाबर -

मुंबई: शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट आणि राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा (Dasara Melava) यंदा पार पडणार आहे. मात्र, दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कमध्ये कोणाला परवानगी मिळणार हा पेच कायम आहे. शिवसेनेनं (Shivsena) दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. शिवाय शिवाजी पार्कमध्ये (Shivaji Park) परवानगी मिळावी यासाठी आता ठाकरे गटाकडून हालचाली देखील सुरु करण्यात आल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचं एक शिष्टमंडळ मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) जी उत्तर विभाग येथील कार्यालयात शिवसेना दसरा मेळावा संदर्भात भेट देण्यास आले होते. शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य आणि महेश सावंत आणि इतर कार्यकर्ते पदाधिकारी आले होते. या पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे भेट घेतली असून शिवाजी पार्कच्या मैदानात दसरा मेळावा कोणाचा होणार या अनुषंगाने ही भेट घेतली होती.

पाहा व्हिडीओ -

शिवसेनेने महानगरपालिकेला दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थ देण्यात यावे यासाठी शिंदे गटाने देखील मागणी केली आहे. तरीही महानगरपालिकेकडून कोणतीच कल्पना ठाकरे गटाला दिलेले नाही. मिलिंद वैद्यांनी भेट घेतल्यानंतर सांगितले आहे की महानगरपालिकेने विधी विभागाकडे त्यांच शिवतीर्थ संबधातला अर्ज दिला आहे. विधी विभाग या अर्जाची लेखी प्रतिक्रिया देणार असून आम्ही दसरा मेळावा शिवतीर्थावरच घेणार असल्याचही वैद्य म्हणाले.

शिवाजी पार्क कोणालाच नाही -

ठाकरे आणि शिंदेगटात शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठ रस्सीखेच सुरु आहे. मात्र, शिवाजी पार्कचे मैदान दोघांपैकी कोणालाच न देण्याची भूमिका मुंबई महापालिकेने घेतली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिवाय गृहविभागाने देखील हिच भूमिका घेतली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heatwave Care: उष्माघाताच्या त्रासापासून वाचण्यासाठी 'अशी' काळजी घ्या

Today's Marathi News Live : नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू; धमकीच्या मेलने खळबळ

Viral Video: मस्ती केली, चांगलीच जिरली! भररस्त्यात तरुण खुर्ची टाकून बसला; पुढं जे घडलं ते... धक्कादायक VIDEO

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत, साई भक्ताकडून 24 लाखाच्या मशीनची देणगी

Mumbai Local News Today: लोकलचा डबा रुळावरुन घसरला! कुठे? कधी? कसा? हार्बर लाईनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

SCROLL FOR NEXT