mpsc student darshana pawar death case pune police give shocking information Saam TV
मुंबई/पुणे

Darshana Pawar Death Case: दर्शना पवार हत्या प्रकरणात मोठी अपडेट, मित्र राहुल हांडोरेला अटक

Darshana Pawar Death Case Accused Rahul Handore Arrested : मुंबई येथून राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune News:  MPSC टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दर्शना हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मुंबई येथून राहुल हंडोरेला अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी राहुल हांडोरेच्या तपासासाठी ५ पथके रवाना केली होती.

दर्शना पवार तिचा मित्र राहुल हांडोरेसोबत १२ जूनला राजगडावर फिरायला गेली होती. मात्र जवळील हॉटेलच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये राहुल एकटाच राजगडावरुन खाली उतरताना दिसला होता. त्या दिवसापासून राहुल हांडोरे गायब होता. त्यामुले दर्शनाची हत्या राहुलनेच केल्याचा संशय पोलिसांना होता. त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी पथकंही तयार केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल हांडोरे गायब झाल्यानंतर त्याचं शेवटचं लोकेशन कात्रज दिसत होतं. त्यानंतर दोन दिवसांनी तो गायब झाला होता. पुण्यानंतर दिल्लीतील एटीएम सेंटरवरुन त्याने एटीएम कार्डवरुन पैसे काढले होते. त्यानंतर त्याच्या फोनचं लोकेशन ट्रेस केलं असता ते कोलकाता होतं.  (Pune News)

अशारितीने तो आपली जागा सतत बदलत होता. मात्र तो मुंबईत आल्याननंतर वाहतूक पोलिसांनी त्यांना अटक केली. प्राथमिक माहितीनुसार राहुलला दर्शना सोबत लग्न करण्याची इच्छा होती. यातूनच तिची हत्या झाल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT