आव्हाडांच्या वक्तव्याचे समर्थन; बावनकुळे दलितांची माफी मागा- दलित पँथर
आव्हाडांच्या वक्तव्याचे समर्थन; बावनकुळे दलितांची माफी मागा- दलित पँथर Saam TV
मुंबई/पुणे

आव्हाडांच्या वक्तव्याचे समर्थन; बावनकुळे दलितांची माफी मागा- दलित पँथर

विकास काटे, ठाणे

ठाणे : सुरुवातीलाच मराठा - ओबीसी समाजाने आरक्षणाच्या (OBC Reservation) लढाई आणि मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आम्हा दलितांची साथ दिली असती, तर आज त्यांना हवे असलेले आरक्षण नक्कीच त्यांच्या पदरात पडले असते. पण त्यावेळी आम्ही एकटेच लढलो. असे सांगत दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या वक्तव्याचे समर्थन करत आजवर दलितांवर जातीय अत्याचार केल्याबद्दल भाजपचे ओबीसीचे नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनीही दलित समाजाची माफी मागावी असे थेट आव्हान दिले.

खेड्यापाड्यात मराठा - ओबीसी समाज आणि मागासवर्गीयांमध्ये संघर्ष झाला आहे. गाव - खेड्यातील पोलिस ठाण्यात असलेले दफ्तर तपासले तर मागवर्गियांवर अन्याय करणाऱ्यांमध्ये या समाजाचा मोठा वाटा असल्याचे दिसून येते. पण सुदैवाने आता या समाजाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे महत्त्व समजले आहे. त्यांना हवे असलेले आरक्षण केवळ बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गानेच मिळू शकते. म्हणूनच हा समाज आता आमचा आहे.

त्यांच्यावरील अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यांना हव्या असलेल्या आरक्षणाच्या लढाईत आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्त्यावर उतरू, हा समाज आता बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक होतो आहे. त्यामुळे त्यांच्या विकासाच्या वाटा आता कोणीही अडवू शकणार नाही. असे पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ तायडे यांनी सांगितले. ठाण्यात पत्रकारांशी ते बोलत होते,

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, २० मे २०२४ : मेषसह ४ राशींना मिळणार नशीबाची उत्तम साथ, तुमची रास कोणती?

Horoscope Today: तुमच्यासाठी सोमवार सुखाचा ठरेल की दुखाचा? वाचा राशिभविष्य

31km मायलेज, Z सीरीज इंजिन; पहिल्यांदाच सनरूफसह येणार मारुतीची नवीन कार

Kia आणि Toyota च्या या 7 सीटर कार्सची किंमत 11 लाखांपेक्षाही आहे कमी, मिळतात हाय क्लास फीचर्स

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

SCROLL FOR NEXT