Chain snatching x
मुंबई/पुणे

Dahisar Police : चेन स्नॅचिंग प्रकरणात सराईत चोरटा गजाआड, दहिसर पोलिसांनी मध्यप्रदेशमधून केली अटक

Dahisar : दहिसर येथे वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावणारा सराईत चोरटा गजाआड झाला आहे. आरोपीवर चेन स्नॅचिंगच्या अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. दहिसर पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशहून अटक केली.

Yash Shirke

  • दहिसर पोलिसांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत चोरट्याला मध्यप्रदेशातून अटक केली.

  • आरोपी हा चेन स्नॅचिंगसह अनेक चोरी प्रकरणांत सहभागी होती.

  • पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेली अनेक सोन्याच्या गोष्टी जप्त केल्या आहेत.

संजय गडदे, साम टीव्ही, प्रतिनिधी

वृद्ध महिलांना लक्ष्य करुन चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत चोरट्याला दहिसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला पोलिसांनी मध्य प्रदेश येथून अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून चोरी केलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपी अन्य कोणत्या गुन्ह्यात सहभागी आहे का याचा दहिसर पोलीस तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव ग्यासुद्दीन अब्दुल सत्तर शेख (वय २७ वर्षे) असे आहे. तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. सीसीटीव्ही फुटेज, जीआरपी यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी ज्या ठिकाणी लपला होता, त्याची माहिती मिळवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास यशवंत तावडे रोड, आजम डेअरीजवळ आरोपीने एका महिलेला १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे चेन हिसकावले होते. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा मागोवा घेतला. तपासात आरोपी ट्रेनने बिहारला पळून जात असल्याचे स्पष्ट झाले.

दहिसर पोलिसांनी जीआरपीच्या मदतीने मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून चोरलेले सोन्याचे चेनही जप्त करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये चेन स्नॅचिंगचे तीन गुन्हे आधीच नोंद आहेत. पोलिस आता त्याने आणखी कुठे-कुठे अशा प्रकारच्या चोरीच्या घटना केल्या आहेत का, याचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

18th Newsmakers Achievers Awards 2026: मुंबईत विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचा गौरव

SCROLL FOR NEXT