Dahisar Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Dahisar Crime News: चोरीच्या नादात पाय फॅक्चर, दातही तुटले; स्पायडरमॅन चोर पोलिसांच्या ताब्यात, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Theft In Dahisar: पाय फ्रॅक्चर, दातही तुटले...तिसऱ्या मजल्यावरून पडलेल्या चोराच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Ruchika Jadhav

Dahisar Crime News:

राज्यातील चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. चोरट्यांचा सुळसूळाट झाल्याने नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलंय. अशात दहिसरमधून चोरीची अशीची एक घटना समोर आली आहे. या घटनेत पोलिसांनी आरोपी चोराच्या तुटलेल्या दातांवरून त्याची ओळख पटवलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एम एच बी येथे काही दिवसांपूर्वी एका चोराने इमारतीत शिरून तेथील अनेक घरांवर आपला हाथ साफ केला. चोरी करताना तो स्पायडरमॅनसारखा एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर झेप घेत होता. स्पायडरमॅन सारखी कला करून चोरी करणे या चोराला चांगलेच महागात पडले आहे.

शेवटच्यावेळी चोरी करताना हा चोर थेट तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. खाली पडताच त्याला मोठी दुखापत झाली. या अपघातात त्याच्या पायांना लागले. त्याचा एक पाय फॅक्चर झाला आणि पुढचे दोन दातही पडले. मात्र चोरी केलेला माल घेऊन तो तेथून पसार झाला.

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांना बिल्डींगखाली दोन तुटलेले दात सापडले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासला तेव्हा हे दात चोराचेच आहेत असं पोलिसांना समजलं. पुढे आपल्या तपासाचे चक्र पोलिसांनी वेगाने फिरवले.

चोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी आसपासचे दवाखाने तपासले. तेथे चौकशी केली असता पोलिसांनी जवळचे दवाखाने आणि रुग्णालयात चौकशी केली त्यावेळी या चोरट्याचा तपास लागला. रोहित असं त्याचं नाव आहे. त्याच्यावर एकूण १९ गुन्हे दाखल आहेत.

आतापर्यंत डी एन नगर, कांदिवली, बोरिवली, वाकोला, सांताक्रूझ, दहिसर, कस्तुरबा मार्ग आणि इतरही अनेक पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT