Aditya Thackeray  Saam TV
मुंबई/पुणे

उठल्याबसल्या राजकारण हा बालिशपणा, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटासह भाजपला टोला

काही काही लोकांना दिवसरात्र राजकारण आणि दुसऱ्यांना खाली कसं खेचायचं एवढंच येतं - आदित्य ठाकरे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निवृत्ती बाबर -

मुंबई: काही काही लोकांना दिवसरात्र राजकारण आणि दुसऱ्यांना खाली कसं खेचायचं एवढंच येतं, आजच्या दिवशी राजकारण करू नये. उठल्याबसल्या राजकारण हा बालिशपणा असू शकतो, असा टोला शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपला (BJP) लगावला आहे. ते शिवसेना भवन येथील दहीहंडी कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde and Devendra Fadnavis) यांनी आज सकाळपासून अनेक दहीहंडीना भेटी दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या मागील सरकारवर टीका केली. मागील सरकारणे सणांवरती निर्बंध लावले, आपण ते उठवले आहेत.

पाहा व्हिडीओ -

शिवाय आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहोत. असं फडणवीस म्हणाले. तर आम्ही मागील महिन्यामध्ये सर्वात मोठी ५० थराची राजकीय हंडी फोडली असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता ठाकरे सरकारला टोला लगावला.

याच सर्व पार्श्वभूमीवर आता आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील शिंदे गट आणि भाजपला टोला लगावला आहे. आदित्य म्हणाले, काही काही लोकांना दिवसरात्र राजकारण आणि दुसऱ्यांना खाली कसं खेचायचं एवढंच येतं. आम्ही आज दहीहंडीचा सण साजरा करतोय सर्वांना साथ देऊन पुढे घेऊन कसं जायचं हा विचार करत असतो.

आजच्या दिवशी राजकारण करू नये. उठल्याबसल्या राजकारण हा बालिशपणा असू शकतो. असं म्हणत त्यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. तसंच या सणामध्ये कोणी राजकारण करू नये, कोव्हीड काळानंतर २ वर्षानी दहीहंडी सण साजरा होतोय तर सर्वांनी आनंद घेऊया, राजकारण करायला अनेक दिवस असतात.

ज्यांचे हिंदू धर्मावर प्रेम असेल ते यामध्ये राजकारण आणणार नाहीत. दुर्दैव हे आहे की आजच्या दिवशीही राजकारण होतं आहे. आज तरी राजकारण करू नका अशी विनंती करत असल्याचंही आदित्य यावेळी म्हणाले.

तसंच आम्ही जे सर्वत्र कामं केलंय ते लोकांनी बघतील आहे. सणाच्या दिवशी राजकारण करणं योग्य नाही.ठाण्यात मला राजन विचारे साहेबांनी बोलवलं आहे. या अगोदर मला अनेक ठिकाणांवर आमंत्रण असायचं पण त्यांचे मन परिवर्तन झालं आहे असं म्हणत त्यांनी शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT