Dadar Kabutar Khana  Saam tv
मुंबई/पुणे

Dadar Kabutar Khana : 'कबुतरांसाठी गरज पडल्यास शस्त्र हाती घेऊ'; जैन मुनींचा सरकारला इशारा, VIDEO

jain muni on Dadar Kabutar Khana : दादरमधील कबुतरखान्यांचा विषय दिवसेंदिवस तापतोय. अशातच आता जैन मुनींनी उपोषण करण्याचा इशारा दिलाय. कबुतरांसाठी जैन मुनींनी नेमकी काय भूमिका घेतली? आमदार मनीषा कायंदे याविषयी काय म्हणाल्या आणि सर्वसामान्य रहिवाशांची काय भूमिका काय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..

Suprim Maskar

दादरमधील कबुतरखाना बंद करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिल्यानंतर आता जैन समाज आक्रमक झालाय. जैन समाजानं कबुतरखान्यासाठी उपोषनाचं आणि आंदोलनाचं हत्यार उपसणार असल्याचं जाहीर केलयं...त्यामुळे कबुतरखान्याचा वाद दिवसेंदिवस चिघळत असल्याचं पाहायला मिळतयं.. अशातच जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी 13 ऑगस्टपासून न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जैन समाज उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय..

दुसरीकडे कोर्टाचा आदेश झुगारुन कबुतरांना खायला घालणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केलीय.. दरम्यान शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदेंनी जैन मुनींच्या इशाऱ्यावर कठोर शब्दात टीका केलीय. मंदिरांना जाळ्या लावयच्या आणि इतरांना उपद्रव सहन करायला लावयचा ही कुठली सहिष्णुता, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय...

कबुतरांच्या विष्ठेनं होणाऱ्या आजारमुळे अनेक नागरिकांनी संतापही व्यक्त केलाय. ब्रिटीश काळापासून मुंबईत काही सामाजिक आणि धार्मिक महत्व असलेले तब्बल 51 कबुतरखाने आहेत...त्यामुळे कबुतरांची संख्याही वाढून नागरिकांना अनेक गंभीर आजारांना सामोरं जावं लागतंय.... म्हणूनच न्यायालयाच्या निर्देशानंतर मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यात आले.

तसेच कबुतरांना खायला टाकणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.. त्यामुळे सरकार उच्च न्यायालयाचा आदेश पाळून नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देणार की धार्मिक संघटनांच्या रेट्यापुढे झुकणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT