कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मालाड मधील डी मार्ट सील! Suraj Sawant
मुंबई/पुणे

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मालाड मधील डी मार्ट सील!

मालाड (पश्चिम) मधील लिंक रोडवर स्थित 'डी मार्ट' स्टोअरमध्ये कोविड-१९ प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करून सदर स्टोअर पी/उत्तर विभाग कार्यालयाने आज सील केले आहे.

सुरज सावंत

मुंबई : मालाड (पश्चिम) मधील लिंक रोडवर स्थित 'डी मार्ट' स्टोअरमध्ये कोविड-१९ विषाणू संसर्ग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करून सदर स्टोअर पी/उत्तर विभाग कार्यालयाने आज सील केले आहे. संबंधित व्यवस्थापकाला नोटीस बजावून यासंदर्भात तीन दिवसात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

हे देखील पहा -

मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये कोविड-१९ विषाणू संसर्ग प्रतिबंधक उपाययोजना लागू आहेत. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार या सर्व उपाय योजनांचे व निर्देशांचे पालन काटेकोरपणे करणे बंधनकारक आहे. या अनुषंगाने आज तपासणी करत असताना, मालाड मधील लिंक रोड स्थित डी मार्ट स्टोअर मध्ये उपाययोजनांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. डी मार्ट च्या कर्मचाऱ्यांनी, विशेषतः बिल काउंटरवरील कर्मचाऱ्यांनी मास्क आणि हातमोजे यांचा वापर केलेला नसल्याचे आढळले.

तसेच कर्मचारी आणि ग्राहक हे सर्व जण वावरत असताना सुरक्षित अंतराचे नियम पाळत नसल्याचेही निदर्शनास आले. एकाच वेळी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी करून उपस्थिती नियमाचा देखील भंग केला. यास डी मार्ट व्यवस्थापन कारणीभूत ठरलेले आहे.

एकूणच, कोविड प्रतिबंधक नियमांचे योग्यरीत्या पालन होत नसल्याने सदर डी मार्ट व्यावसायिक आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद (सील) करण्यात आली आहे. तसेच डी मार्टच्या संबंधित व्यवस्थापकास नियम भंगाबाबत नोटीस बजावून, परवाना रद्द का करण्यात येवू नये, ह्याविषयी तीन दिवसात स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश देखील पी/उत्तर विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी दिले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

SCROLL FOR NEXT