पूरग्रस्तांच्या नावाखाली सायबर भामटे करत आहेत फसवणूक Saam Tv News
मुंबई/पुणे

पूरग्रस्तांच्या नावाखाली सायबर भामटे करत आहेत फसवणूक

सुरज सावंत

मुंबई - महाराष्ट्रावर ओढावलेल्या महापूराच्या संकटानंतर पुरग्रस्त (Flood in maharashtra) नागरीकांना विविध माध्यमातून मदतीचा ओघ सुरू झाला. मात्र याचाच फायदा आता सायबर भामटे (cyber theif) घेऊ लागल्याचे सायबर पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळेच पूरग्रस्तांना मदत करण्यापूर्वी संबधित मदत खरचं केली जात आहे का याची काळजी घेण्याचं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे. (cyber thief are demanding money by cheating flood affected people)

कोरोना काळात मदतीसाठी अनेक ग्रुप सक्रीय झाले होते. या ग्रुपमध्ये कोरोना रुग्णांना हवी असलेल्या मदतीसह त्यांची माहिती शेअर केली जात आहे. काहींना ऑक्सिजन सिलेंडर, प्लाझ्मा तर काहींना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज पडत आहे. मात्र, सायबर गुन्हेगार याच माहितीच्या आधारे रुग्णांना लूटत होते. सायबर पोलिसांनी (cyber police) अशा भुरट्या चोरांना पकडून त्यांच्यावर कारवाई केलीच, माञ असे प्रकार अद्याप थांबलेले नाहीत. सतत येत असलेल्या या फसवणुकीच्या तक्रारींमुळे सायबर एक्सपर्टसनं सल्ला दिला आहे, की रुग्णांच्या नातेवाईकांनी माहिती शेअर करताना सावध राहावं आणि डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवू नये.

हे देखील पहा -

नुकतचं महाराष्ट्रातल्या कोकण आणि पश्चिम परिसरात आलेल्या ओल्या दुष्काळामुळे हजारो कुटुंब उध्वस्त झाली आहेत. या कुटुंबियाना मदतीसाठी आता संस्थांनी मदत सुरू केली आहे. मात्र याचाच फायदा आता सायबर चोरटेही घेत असल्याचे सायबर पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. हे भामटे खोट्या सामाजिक संस्था बनवून पूरग्रस्तांना मदत करत असल्याचे सांगून अवैधरित्या पैसे उकाळत आहेत. तसेच सामाजिक संस्थेचे बँक खाते असल्याचे सांगून वैयक्तीक खात्यावर पैसे जमा करून घेत आहेत. अशा भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

अशा प्रकारे होतेय फसवणूक :

सोशल मीडियावर सामाजिक संस्थेची खोटी प्रोफाईल बनवली जात आहे. आणि आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं जात आहे.

खोट्या प्रोफाइलवर बँक खात्याची ऑनलाईन लिंक देऊन त्यावर फक्त ऑनलाईन पेमेंट स्विकारले जात आहेत.

तर काही भामटे मोबाइलवर थेट लिंक पाठवून त्यावर पर्सनल डिटेल्स टाकण्यास,भरण्यास सांगून डेटा चोरी करून अकाउंंट रिकामं करत आहेत.

सोशल मीडियावर प्राप्त झालेल्या या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. देणगी देण्यापूर्वी संबधित सामाजिक संस्था अधिकृत आहे का हे पडताळून घ्या, देणगी देण्यापूर्वी ऑनलाईन आर्थिक व्यवहार करणारी प्रणाली अधिकृत असल्याची खाञी करून घ्या. आपली फसवणूक झाली असल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करा. तसेच www.cybercrime.gov.in या संकेत स्थळावर तक्रार नोंदवा असे आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री...' बाळासाहेब थोरातांनी सांगितली 'मन की बात'; राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Soan Papdi Recipe : जिभेवर ठेवताच विरघळेल अशी सोनपापडी; घरच्याघरी कशी बनवायची

Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांचा वेगवान आढावा

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT