मुख्यमंत्र्यांबाबतच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, ही ती वेळ नाही!

uddhav thackreay devendra fadanvis
uddhav thackreay devendra fadanvis

कोल्हापूर : ठाकरे सरकारच्या पूरपरिस्थीती हाताळण्याचे मूल्यमापन करणार नाही. ही ती वेळ नाही. आमचे एकच म्हणणे आहे त्यांनी तात्काळ मदत जाहीर केली पाहिजे. त्यानूसार आम्ही बाेलू असे विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस uddhav thackreay devendra fadanvis यांनी स्पष्ट केले. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी uddhav thackreay राज्य बॅंकांची समितीची (एसएलबीसी) तात्काळ बैठक बाेलावून कर्जमाफी, कर्ज स्थगिती तसेच व्याज सवलतीबाबत निर्देश द्यावेत अशी मागणी फडणवीस devendra fadanvis यांनी केली. (devendra-fadanvis-uddhav-thackreay-kolhapur-maharashtra-floods-sml80)

अतिवृष्टीमुळे आेढावलेल्या परिस्थितीची पाहणी गेले तीन दिवसांपासून विराेधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विराेधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे करीत आहेत. या पाहणी दाै-यानंतर आज (शुक्रवार) फडणवीस यांनी काेल्हापूरात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, विधान परिषदेचे विराेधी पक्ष नेते प्रवीण दरेकर उपस्थित हाेते.

फडणवीस म्हणाले तीन दिवस आम्ही पश्चिम महाराष्ट्र दाैरा केला. सातारा, सांगली, काेल्हापूर या तिन्ही जिल्ह्यातील वेगवेगळ्या २२ ठिकाणी भेट दिली आणि लाेकांशी संवाद साधला. यामध्ये पूरग्रस्त, दरडग्रस्त, भूस्खलन भागात गेलाे. या सर्व ठिकाणी सामान्य माणसांच्या अडचणी समजून घेतल्या. सांगली आणि काेल्हापूर भागातील पूराचा विशेष अभ्यास करणे गरजेचे आहे.

uddhav thackreay devendra fadanvis
असं आयुष्य जगायचं नाही ना? मग 'हे' करा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

काेल्हापूरात सन २००५ महापूर पाहिला. एकूण सरारीपेक्षा १५९ टक्के पाऊस २१ दिवसांत झाला हाेता. सन २०१९ मध्ये सरारीपेक्षा ४८० टक्के पाऊस झाला हाेता. ताे नऊ दिवसांत झाला हाेता. आत्ताचा पाऊस हा पाच दिवसांत सरारीपेक्षा ५० टक्के झालेला आहे. सांगलीत सन २००५ मध्ये सरारीपेक्षा २१७ टक्के पाऊस झाला, सन २०१९ मध्ये ७५८ टक्के सरारीपेक्षा जादा पाऊस नऊ दिवसांत झाला हाेता. तेथेही दाेन महिन्यांत सरारीपेक्षा ५० टक्के पाऊस झाला आहे. यंदा पाऊस माेठ्या प्रमाणात नाहीये. अलमट्टी, राधानानगरीच्या विसर्गाची अडचण देखील निर्माण झालेली नाही. या परिस्थितीत आम्ही पाहणी केलेल्या ठिकाणी उच्च पूर रेषा आहे ती सन २०१९ च्या वर आम्हांला पहायला मिळाली. या पूराकडे अतिशय गांभीर्याने पाहावे लागले. तेवढ्या माेठ्या प्रमाणात पाऊस न हाेता आणि विसर्ग न हाेता पाणी का साठले याचा विचार करुन त्याच्या उपयायाेजना संदर्भात बघावे लागेल.

काेल्हापूरात ३९६ गावे पूरबाधित झाली आहेत. दाेन लाखांपेक्षा जास्त कुटुंबावर परिणाम झाला आहे. सात हजार पेक्षा क्षेत्र बाधित झालेले आहे. या बराेबरच प्रशासकीय इमारती, शाळांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. घरांचे, दुकानांचे माेठे नुकसान झालेले आहे. राज्य सरकारची तातडीची मदत मिळणे आवश्यक हाेती ती काही लाेकांना मिळालेली नाही. आमच्या पाहणी दाै-यात नागरिक आम्हांला सांगत हाेते सन २०१९ च्या मदतीचा उल्लेख करीत हाेते. ते सांगत हाेते आम्हांला त्यावेळी तातडीने मदत दिली. एखादी आपत्ती आल्यानंतर लाेकांना तात्काळ मदत देणे हे प्रथम कर्तव्य असते.

uddhav thackreay devendra fadanvis
चिखलीकरांना देवेंद्र फडणवीसांनी दिले 'हे' आश्वासन

गतवेळ सारखी मदत व्हावी अशी अपेक्षा पूरग्रस्तांची आहे. अद्याप सरकारकडून काेणतीच मदत दिलेली नाही. ज्यावेळे पाणी शिरते तेव्हा घरातील सर्व गाेष्टींचे नुकासन हाेते. अगदी मिठाचे देखील नुकसान हाेते. अगदी छाेट्या छाेट्या गाेष्टींना पैसे लागताे. त्यामुळे तात्काळ मदत देणे हे कर्तव्य आहे हे सरकारच्या लक्षात येत नाही का असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

महावितरणकडून व्यापा-यांना मीटरचे पैसे मागितले जात आहेत. हे याेग्य नसल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. ते म्हणाले सध्या दुकानदारांच्या मालाचे फार माेठे नुकसान झाले आहे. व्यापा-यांना आम्ही विशेषबाब म्हणून मदत केली हाेती. यावेळी मात्र व्यापा-यांना काहीच दिलेले गेलेले नाही. त्यावेळी आम्ही महावितरणला त्यांच्या खर्चातून मीटर बसविण्याचे आदेश दिले हाेते. त्यावेळी काेणाकडून डिपाॅझिट देखील घेतले नाही.

शेतीचे फार माेठे नुकसान झालेले आहे. जमीन वाहून गेली आहे. पिकांची नुकसानभरपाई द्यावी लागेल. पूरग्रस्त भागांना आम्ही कर्जमाफी केली हाेती. तशा प्रकारे किमान पूरग्रस्त भागांना सरकारने दिलासा देणे आवश्यक हाेते. कर्ज माफीमधील नियमीत कर्ज भरणा-यांना सरकार ५० हजार देणारे हाेते. ते देखील अद्याप दिलेले नाही. त्यामुळे सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे आणि शेतक-याला माेठी मदत केली पाहिजे असे फडणवीस यांनी नमूद केले.

कुंभार समाजाचे यंदा देखील फार माेठे नुकसान झालेले आहे. या समाजासाठी माती कला बाेर्ड आम्ही तयार केले हाेते. त्याचे पुर्नजिवन करावे. या समाजााल बिनव्याजी कर्ज देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. केवळ कुंभार समाजच नव्हे तर हातावरचे पाेट असणा-यांसाठी सरकारने भरीव मदत केली पाहिजे. काेल्हापूरात बास्केट ब्रिजची संकल्पना तातडीने पुर्ण झाल्यास काही अंशी पूराच्या पाण्याचा प्रश्न सुटेल असे वाटते.

कृष्णा भिमा स्थिरिकरण याेजना आणि बाेगद्यांच्या माध्यमातून पूराच्या पाण्याचा निचरा करण्याचा आरखडा आम्ही तयार केला हाेता. त्याचा पुन्हा एकदा विचार व्हावा यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. या सर्व पूरांवर ही एकमेव मात्र आहे असे फडणवीसांनी नमूद केले. आम्ही पाहणी दाै-यातील सर्व बाबी सरकारपुढं मांडणार आहाेत. लवकरात लवकर लाेकांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करु असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

uddhav thackreay devendra fadanvis
काय सांगता! अस्वल निवांतपणे अेालांडत हाेते रस्ता

राज्यातील सर्व बॅंका एसएलबीसीच्या अख्यत्यारित येतात. या एसएलबीसीचे प्रमुख हे मुख्यमंत्री असतात. मुख्यमंत्र्यांनी एसएलबीसीची तात्काळ बैठक बाेलावावी. आप्तकालीन परिस्थितीत एसएलबीसीची बैठक आम्ही देखील यापुर्वी बाेलावून बॅंकांना निर्देश दिले हाेते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफी, कर्ज स्थगिती, व्याज सवलतीचे निर्णय घ्यावेत. ते अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. व्यापा-यांना व्याज सवलत देता येईल याचा विचार सरकारने करावा. काही बॅंका मदत देण्यामध्ये अडचणी निर्माणी करतात हा अनुभव आम्हांला पण आहे. त्यासाठी प्रशासनाने लक्ष घालून त्याच दिवशी त्याच व्यक्तीला पैसे मिळाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करावेत.

ठाकरे सरकारच्या पूरपरिस्थीती हाताळण्याचे मूल्यमापन करणार नाही. ही ती वेळ नाही. आमचे एकच म्हणणे आहे त्यांनी तात्काळ मदत जाहीर केली पाहिजे. त्यानूसार आम्ही बाेलू शकताे असेही फडणवीसांनी नमूद केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com