Ayodhya Ram Mandir  Saam tv
मुंबई/पुणे

Ram Temple Inauguration: सायबर ठगांकडून रामभक्त टार्गेट; करताहेत ऑनलाइन फसवणूक, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केलं सावध

Ram Temple Inauguration: सर्वसामान्यांच्या याच भावना लक्षात घेऊन सायबर ठगांनी नागरिकांची फसवणूक करण्यास सुरूवात केली आहे. याच प्रकारच्या काही घटना महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे समोर आल्या आहेत.

सूरज सावंत

Ayodhya Ram Temple:

२२ जानेवारी अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या सोहळ्याचा साक्षीदार होण्याची अनेक रामभक्तांची भावना आहे. मात्र, सर्वसामान्यांच्या याच भावना लक्षात घेऊन सायबर ठगांनी नागरिकांची फसवणूक करण्यास सुरूवात केली आहे. याच प्रकारच्या काही घटना महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे समोर आल्या आहेत. (Latest Marathi News)

भक्तांची फसवणूक कशी केली जात आहे?

राज्यात काही सायबर ठगांकडून राम भक्तांना टार्गेट करण्यात येत आहे. सायबर चोरटे नागरिकांना मेसेज करतात आणि त्यांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेसाठी व्हीआयपी पास देऊ, असे आश्वासन देत आहेत. त्यानंतर रामभक्तांना मेसेज करून लिंक पाठवतात. त्या लिंकवर क्लिक करून भक्तांना अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगतात.

नागरिकांना ही लिंक डाऊनलोड करून विविध प्रकारचे अॅक्सेस देण्यास सांगतात. नागरिकांनी माहिती देताच, सायबर चोरटे समोरील नागरिकाच्या मोबाइलवर पूर्ण नियंत्रण मिळवतात. त्यानंतर हे चोर तुमचा डेटा आणि तुमच्या खात्यातून पैसेही काढू शकता, अशी माहिती देत महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नागरिकांना सतर्क केलं आहे.

उड्डाणे महागले

अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत चार्टर फ्लाइटच्या मागणीत वाढ झाली आहे. यामध्ये दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद आणि नागपूरसह देशातील विविध शहरांतील चार्टर फ्लाइट सामावेश आहे. लोकांकडून मागणी वाढल्याने चार्टर फ्लाइटचे भाडेही महागले असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मंदिरात घेऊन गेला, मंत्रोच्चार करत अघोरी विधी; अंगाऱ्याचा पेढा खायला दिला, नंतर...

Maharashtra Live News Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 सप्टेंबरला

Crime News : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाची बीडमध्ये पुनरावृत्ती, विवाहानंतर दोन महिन्यांतच सासरकडून छळ, तरुणीचा मृत्यू

Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये जोरदार हाणामारी, बुक्क्यांनी एकमेकांना फोडलं |VIDEO VIRAL

Lakhani Bajar Samiti : लाखनी बाजार समितीत बिलांचा घोटाळा; बोगस जीएसटी बिल दाखवून फसवणूक, ६० टनाचा काटा जप्त

SCROLL FOR NEXT