Mumbai : आशिष शेलारांच्या उपस्थितीत रंग शारदा नाट्यगृहाचा पडदा उघडला  SaamTvNews
मुंबई/पुणे

Mumbai : आशिष शेलारांच्या उपस्थितीत रंग शारदा नाट्यगृहाचा पडदा उघडला

रंगशारदा या नावातच रंग आणि शारदा आहे. रंग मंचाचे नाव आहे नाटकार विद्याधर गोखले अशा रंगमंचावरुन आज पुन्हा तिसरी घंटा वाजवताना मला गहिवरुन आलं अशा शब्दात मराठीबाणाकार अशोक हांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : रंगशारदा या नावातच रंग आणि शारदा आहे. रंग मंचाचे नाव आहे नाटकार विद्याधर गोखले अशा रंगमंचावरुन आज पुन्हा तिसरी घंटा वाजवताना मला गहिवरुन आलं अशा शब्दात मराठीबाणाकार अशोक हांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांच्या पुढाकाराने आज रंगशारदा नाट्यगृहाचा पडदा समारंभपुर्वक उघडण्यात आला. यावेळी अभिनेते प्रशांत दामले, कविता लाड, मधुरा वेलणकर, जयवंत वाडकर, संगीतकार मिलिंद जोशी आदी उपस्थितीत होते.

हे देखील पहा :

लाँकडाऊनंतर आज मराठी नाटक पहायला आलेल्या नाट्य रसिकांचे आमदार ऍड.आशिष शेलार यांनी रंगशारदाच्या प्रवेशव्दारावर फुल देऊन स्वागत केले. आज पासून नाटकाला परवानगी दिल्याच्या निमित्ताने हा विशेष खेळ आयोजित करण्यात आला होता. यावेळी रंगभूमीवरील तंत्रज्ञ व पडद्यामागच्या कलावंताना कोरोना काळात मदत करणाऱ्या अशोक हांडे, प्रशांत दामले, बाबू राणे, प्रिती जामकर, रत्नाकर जगताप, हरी पाटणकर यांचा आमदार ऍड.आशिष शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी शेलार म्हणाले की, रंगभूमीचा पडदा महायुद्धात, आणीबाणीत ही पडला नव्हता पण या नैसर्गिक संकटात तो पडला. त्यानंतर इतर घटकांचा महाराष्ट्र शासनाने जसा विचार करून सवलत दिली तशी सवलत मराठी रंगभूमीला देण्यास विलंब झाला. मराठी रसिक आणि कलावंत यांची झालेली ताटातूट लवकर संपावी व पुन्हा भेट व्हावी म्हणून शासनाने प्रयत्न केले नाही. मद्य आणि मद्यप्रेमी यांची ताटातूट फारकाळ सरकारने होऊ दिली नाही तसा विचार नाट्यरसिकांचा संवेदनशील पणे सरकारने केला नाही, असा टोला यावेळी त्यांनी लगावला. प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात यावेळी प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग रंगला.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: ...युबीटी को पता चला कौन है असली शेर, खरी शिवसेना कुणाची हे जनेतेने दाखवून दिलं; विजयानंतर शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा

Navi Mumbai: नवी मुंबईवरून नागपुरला अवघ्या दीड तासांत; विमानसेवा कधीपासून सुरू होणार; तिकीटाचे दर किती?

Maharashtra Live News Update: नगरपरिषद निवडणुकीतील मोठ्या यशानंतर आता महायुतीचं मिशन महापालिका

Ghevda Bhaji Recipe : घेवड्याची चमचमीत भाजी कशी कराल? वाचा पारंपरिक रेसिपी

Sachin Pilgaonkar : 'ही डान्स स्टेप अक्षय खन्नाला सचिनजीनी शिकवली'; 'धुरंधर'च्या गाण्यावर सचिन-सुप्रिया थिरकले, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT