पाऊस पडताच मलंगगड परिसरात पुन्हा पर्यटकांची गर्दी... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

पाऊस पडताच मलंगगड परिसरात पुन्हा पर्यटकांची गर्दी...

डोंगर आणि फेसाळलेले धबधबे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात.

प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

कल्याण : कल्याण जवळील मलंगगड Malanggad परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत असून येथील डोंगर रांगा हिरव्यागार झाल्या आहेत. मलंगगडच्या कुशीवली, आंभे परिसरातील डोंगरावर ढगांची चादर पसरली आहे. डोंगर आणि फेसाळलेले धबधबे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतात. Crowd of tourists in Malanggad area

हे देखील पहा-

गेल्यावर्षापासून कोरोना Corona सर्वत्र कहर मांडला आहे. म्हणून प्रशासनाने पर्यटकांसाठी बंदी घातली आहे. मात्र पर्यटक घरी बसून कंटाळलेले आहेत. त्यामुळे आता पाऊस Rain पाडताच पर्यटकांची गर्दी मलंगगड परिसरात होऊ लागली आहे. काल म्हणजे मंगळवारी सायंकाळी कुशीवली गावच्या नदी पात्रात उतरलेल्या पर्यटकांची व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती लागला आहे.

डोंगराळ भागात पडणाऱ्या पावसामुळे मलंगगडच्या नदीला मोठा पूर येत असतो. मात्र याची पर्यटकांना कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याने ते जीव धोक्यात घालून बिनदास्त नदी पात्रात आणि धबधबा परिसरात उतरत आहेत.

हिललाईन पोलिसांनी या परिसरात नाका बंदी देखील सुरू केली आहे .ती फक्त शनिवार आणि रविवारी असते. त्यामुळे इतर दिवशी पर्यटकांची गर्दी होत आहेत. आता पर्यटकांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त कुमक तैनात करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

Dhananjay Munde : पोलिसांना आडनाव लावता येत नसेल तर....; आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून समाजातील समतेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT