कोपर पुलाच्या बांधकामावरून मनसेची टीका... twitter/@manojgharatmnsm, प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

कोपर पुलाच्या बांधकामावरून मनसेची टीका...

डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. मात्र कोपर पुलाच्या बांधकामावरून मनसेने टीका करायला सुरुवात केली आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या कोपर पुलाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. मात्र कोपर पुलाच्या बांधकामावरून मनसेने टीका करायला सुरुवात केली आहे. डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणारा कोपर उड्डाण पुल धोकादायक झाल्यामुळे 15 सप्टेंबर 2019 पासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. (Criticism of MNS over construction of Kopar bridge)

हे देखील पहा -

या पुलावरील वाहतूक ठाकुर्ली उड्डाणपुलावरून वळविण्यात आली होती. मात्र हा पूल अरुंद असल्याने शहरातील अंतर्गत रस्त्यावर वाहतूक कोंडीचा ताण येत होता. यामुळे कोपर पुलाचे काम लवकर मार्गी लावावे अशी मागणी वारंवार होत होती. केडीएमसीने जुना पूल तोडून नवीन पुलाच्या कामास सुरू करण्यात आली. लॉकडाऊन ,तांत्रिक अडचणींवर मात करत दोन वर्षांत या पुलाचे काम अखेर पूर्ण करण्यात आलं.

12 कोटींचा निधी खर्ची घालत अखेर दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या पुलाचे काम पूर्ण झाले असून आज नवीन पूल डोंबिवलीकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांना निश्चितच दिलासा मिळाला असला तरी पुलावरील केलेले डांबरीकरणं किती काळ टिकले यात प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी केलेल्या कामावर टीका केली आहे. घरत यांनी याबाबत एक फेसबुक पोस्ट तयार करून ती व्हायरल केली आहे.आता या टीकेला सत्ताधारी शिवसेना काय उत्तर देते हे पाहावे लागेल..

मनसेचे मनोज घरत यांनी काय पोस्ट केली पहा..

"नवीन ब्रिजवरील रस्ता इतक्या चांगल्या दर्जाचा बनवलाय की न वापरताच चिकटपट्टी पण चिकटवावी लागलीय" असं ट्विट मनसेचे माजी नगरसेवक मनोज घरत यांनी केलं आहे.

दरम्यान आज दुपारी 1 वाजता कल्याण-डोंबिवली मधील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचा उदघाटन सोहळा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पार पडणार आहे. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे कार्यक्रम पार पडेल. यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

Laxman Hake: ओबीसींसाठी आरक्षण संपलं! भुजबळांच्या मेळाव्याआधीच हाकेंचा एल्गार

Jio चे दमदार रिचार्ज प्लान्स! एका रिचार्जमध्ये 10 OTT प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन एकदम FREE, तुम्ही पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT