Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Fight at Railway Station: 'तू मला ब्लॉक का केलं', पती, पत्नी और वो; रेल्वे स्थानकावर तुफान राडा

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Kalyan News: विठ्ठलवाडी रेल्वे स्थानका तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाच्या फलाटावर उभी असताना महिलेला तरुणाने येऊन विचारले. 'तू मला ब्लॉक का केलं', इतक्यात महिलेचा पती आला. पती आणि तरुणामध्ये जोरदार राडा झाला.

कल्याण रेल्वे पोलिसांनी महिलेची छेड आणि तिच्या पतीसोबत हाणामारी करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

उल्हासनगरमध्ये राहणारी एक महिला तिच्या पतीसोबत डोंबिवलीला जाण्यासाठी विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात पाोहचली. काल संध्याकाळी साडे चार वाजता पती पत्नी गाडीच्या प्रतिक्षेत होते. यावेळी पती पाण्याची बाटली घेण्याकरीता कॅन्टीनकडे गेला. (Latest Marathi News)

याचवेळी एक तरुण महिलेच्या जवळ आला. त्याने तू मला ब्लॉक का केलं, अशी महिलेला विचारणा केली. याचदरम्यान तिचा पती आला. पतीने त्याला जाब विचारला. यातून दोघांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. नागरीकांनी त्यांची हाणामारी सोडविली.

या प्रकरणी विठ्ठलवाडी स्टेशनवर असलेल्या पोलिसांच्या मदतीने एका तरुणाला ताब्यात घेतले. कल्याण जीआरपी पोलिसांनी या तरुणावर याच्या विरोदात ३५४, ३५४ ड आणि ३२३ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक केली. बूुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक महेश ढगे यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Crime Story : एक खून, ना CCTV, ना ठोस पुरावे; अवघे दोन क्ल्यू अन् उकललं त्या हत्येचं गूढ

Nashik Crime : विहिरीत कासव पाहायला सांगितलं, नंतर ३ शाळकरी विद्यार्थ्यांना ढकलून दिलं; नाशिकमधील धक्कादायक प्रकार

Yogita Chavan: 'क्या खूब लगती हो...', सोज्वळ अंतराचा कातिलाना अंदाज

IND vs BAN: सिराज भडकला ना राव! रोहित अन् रिषभला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं?- VIDEO

Maharashtra News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या बीड बंदची हाक

SCROLL FOR NEXT