Pune Guardian Minister: दादा विरुद्ध दादा! पुण्याचं पालकमंत्रिपद कोणाला?

दादा विरुद्ध दादा! पुण्याचं पालकमंत्रिपद कोणाला?
Chandrakant Patil Vs Ajit Pawar
Chandrakant Patil Vs Ajit PawarSaam Tv
Published On

>> अक्षय बडवे

Chandrakant Patil Vs Ajit Pawar: शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांनी उमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस मधून बंड करत शिंदे फडणवीस सरकार मध्ये प्रवेश केला. त्यामुळं आता मंत्रीपद मिळेल पण पुण्याच्या पालकमंत्री कोण? अजित पवार की चंद्रकांत पाटील?

दोन दादा पैकी पुण्याचे पालकमंत्री कोण होणार याकडे लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेते हे भाजप आणि शिवसेना युती सोबत आल्यामुळे आता काही जणांची "गोची" झाली आहे हे मात्र नक्की. अशातच पुण्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे जाऊ शकतं, अशी चर्चा देखील आता रंगू लागली आहे. त्यामुळे आता दादा विरुद्ध दादा असा सामना पाहायला मिळेल असं दिसतंय.

Chandrakant Patil Vs Ajit Pawar
Supriya Sule on Ajit Pawar: 'बापाचा नाद करायचा नाही', सुप्रिया सुळेंनी थेट अजित पवारांना ललकारलं

अजित पवार यांनी ३ दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. आता मंत्रिपद मिळताच अजित पवार हे पुण्याच्या पालकमंत्रिपदावर दावा ठोकणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुका विचारात घेतल्या तर पुणे जिल्ह्यावर वर्चस्व ठेवायचे असेल, तर पालकमंत्री पद महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत की अजित यापैकी कोणत्या दादाकडे जाणार यावरून आता चर्चा रंगू लागल्या आहेत. (Latest Marathi News)

पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पालकमंत्री हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. २००४ ते २०१४ या आघाडी सरकारच्या कालवधीत पवार यांच्याकडे हे पद होते. तर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर ही अजित पवार यांच्याकडेच हे पद आले होते.

Chandrakant Patil Vs Ajit Pawar
Sharad Pawar Speech: पक्ष चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही; शरद पवारांनी ठणकावून सांगितलं

मात्र, वर्षभरापूर्वी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी आली. आता नव्याने अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील झाले आहेत. जेमतेम वर्षभरातच आता अजित पवार यांच्या सत्ता प्रवेशाने पालकमंत्री पदावरून आता राजकीय फडात गप्पा रंगताना दिसतायत.  (Maharashtra Politics)

दरम्यान, पुणे शहर व जिल्ह्यात मिळून २१ आमदार आहेत. शहराचा विचार केला तर ८ आमदारांपैकी ५ भाजपचे, २ राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि १ आमदार काँग्रेसचा आहे. आगामी काळ हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा आहे. प्रशासनावरील पकड, कामाचा झपाटा पाहता पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील आणि भाजपची कसोटी पाहायला मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com