manpada police station  Saam TV
मुंबई/पुणे

Koyta Gang Dombivli News: कोयता गँग पॅटर्न डोंबिवलीत? गुंडांचा वृद्ध दाम्पत्याच्या घरात घुसून धुडगूस

Dombivli Crime News: डोंबिवलीतील देसले पाडा परिसरात हा प्रकार घडला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अभिजीत देशमुख

डोंबिवली : पुण्यानंतर आता डोंबिवलीतील कोयत्याची दहशत एका घटनेमुळे निर्माण झालं आहे. काही गुंडांनी हातात कोयता घेऊन वृद्ध दाम्पत्याच्या घरी धुडगूस घातल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवलीतील देसले पाडा परिसरात हा प्रकार घडला आहे. तुमचा मुलगा कुठे आहे असं विचारत या टोळीने घराच्या दरवाजावर कोयत्याने प्रहार केला. या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण पसरलं आहे. (Crime News)

डोंबिवली पूर्वेकडील देसले पाडा परिसरात बेबी देसले व त्यांचे आजारी पती हे आपल्या मुलासह राहतात. शनिवारी बेबी आणि त्यांचे आजारी पती घरात एकटे होते. याच दरम्यान जितू निषाद व त्याचे चार साथीदार त्या्ंच्या घराजवळ येऊन शिवीगाळ करू लागले. तुमचा मुलगा कुठे आहे असे बोलत त्यांनी हातातील कोयत्याने घराच्या दरवाजावर जोरदार हल्ला केला. (Latest Marathi News)

या हल्ल्यामुळे घाबरलेल्या बेबी देसले यांनी त्यांना मुलगा घरात नसल्याचे सांगितले. मात्र या टोळीने जबरदस्तीने दरवाजा उघडून घरात घुसून जोर जोरात ओरडून धिंगाणा घातला. याच दरम्यान गोंधळ ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. यावेळी जितू आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना देखील धमकी दिली.

याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली तर पुन्हा मारू, अशी धमकी जीतू व त्याच्या साथीदारांनी या वृद्ध दाम्पत्याला दिली. जवळपास अर्धा ते पाऊण तासात धिंगाणा सुरू होता. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात जितू व त्याच्यासाठी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानपाडा पोलीस जितू व त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. दरम्यान जितू निषाद विरोधात याआधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या परिसरात त्याची दहशत आहे. लवकरच जितू व त्याच्या साथीदारांना अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं मानपाडा पोलिसांकडून आश्वासन देण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shatank Yog 2025: शनी-बुध ग्रहाच्या युतीने या राशींचं नशीब बदलणार; लवकरच पूर्ण होणार सर्व इच्छा

Fact Check : अवतार-3 मध्ये गोविंदा विशेष भूमिकेत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

SCROLL FOR NEXT