Kondhwa Police Station Saamtv
मुंबई/पुणे

Pune Crime News: सांस्कृतिक शहरात चाललंय काय? कोंढव्यात टोळक्याचा तुफान राडा; हॉकी स्टिक, तलवारीने १५ ते २० वाहनांची तोडफोड

Crime News: या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> सचिन जाधव

Pune News: पुणे शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस होणारी वाढ चिंतेचा विषय ठरत आहे. शहरात कोयता गॅंगमुळे दहशतीचे वातावरण असताना कोंढवा (kondhwa) परिसरात एका टोळक्याने धुमाकूळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या टोळक्याने तलवारी आणि हॉकी स्टिकने परिसरातील पंधरा ते वीस वाहनांची केली तोडफोड केली आहे. (Latest Marathi News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या टिळेकर नगर मध्ये या टोळक्याने राडा घातला.दोन गटांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी ऋषिकेश मोरे, सुशील दळवी प्रवीण भोसले आणि त्याच्या इतर साथीदारांनी गाड्यांची तुफान तोडफोड केली. टिळेकरनगर मधील संजीव कुमार धनी यांच्या घरासमोर पार्क केलेल्या सहा चार चाकी, तिन दुचाकी, एक रिक्षा आणि छोटा हत्ती गाडीच्या काचा फोडल्या गेल्या.

टिळक नगर परिसरातील एका तरुणीने आरोपीला शिविगाळ केली होती, यावरुनच हा राडा घातल्याचे समोर आले आहे. या धक्कादायक घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे आणि भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पंधरा दिवसातील ही दुसरी घटना आहे. अशाप्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागरिकांमधून पोलिस प्रशानसनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास कोंढवा पोलिस करत आहेत. (Pune News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

Latur News: शिक्षण संस्थाचालकाची आत्महत्या, डोक्यात गोळी झाडून संपवलं; लातूर हादरले

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT