Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: बुटात लपवलं, ट्राउझर्समध्ये दडवलं, तरी पकडलं! मुंबई विमानतळावर 6 किलो सोने जप्त

Mumbai News: बुटात लपवलं, ट्राउझर्समध्ये दडवलं, तरी पकडलं! मुंबई विमानतळावर 6 किलो सोने जप्त

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Crime News: मुंबई विमानतळावर आज सीमा शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. सीमा शुल्क विभागाने आज ६ किलो सोने जप्त केलं आहे. आठ वेगवेगळ्या कारवाईमध्ये तब्बल 3.20 कोटी रुपयांचे 6.19 किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुबईहून मुंबईला पाच प्रवासी आले होते. तर इतर प्रवासी बँकॉक, दमम आणि रियाद या देशातून आले होते. सोन्याची पट्टी आणि सोन्याची धूळ वेगवेगळ्या पद्धतीने लपवून तस्करी केली जात होती.

कपडे तसेच अंतर्वस्त्र, शूज आणि पससेंजर्सने परिधान केलेल्या ट्राउझर्सच्या कमरेवर लपवून सोन्याची तस्करी करण्यात आली होती. मात्र त्यांना विमानतळावरच सीमा शुल्क विभागाने ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

30 कोटी रुपये किमतीच्या महागड्या घड्याळे डीआरआयने केली जप्त

दरम्यान, याआधीही मुंबईत तस्करी करून देशात आणलेली 30 कोटी रुपये किमतीची महागडी घड्याळे, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ताब्यात घेतले होते.

डीआरआयच्या मुंबई विभागीय पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एका व्यक्तीच्या निवासी परिसरात 30 पेक्षा जास्त महागडी परदेशी घड्याळे ठेवलेली होती. सदर व्यक्ती परदेशी गेला असून भारतात परत येताना कोणतेही शुल्क न भरता अशाच प्रकारची महागडी, परदेशी घड्याळे आणण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती विभागाला मिळाली. यानुसार ही कारवाई करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

Tapola Tourism : महाबळेश्वरपासून हाकेच्या अंतरावर वसलय हिडन हिल स्टेशन पाहा काश्मिरसारखे सौंदर्य क्षणात

SCROLL FOR NEXT