BJP to Protest: फडणवीसांवरील टीकेनं भाजप कार्यकर्ते भडकले, कार्यालयाबाहेरच 'सामना'ची केली होळी

Bjp To Protest Against Saamana Newspaper: फडणवीसांवरील टीकेनं भाजप कार्यकर्ते भडकले, कार्यालयाबाहेरच 'सामना'ची केली होळी
Bjp To Protest Against Saamana Newspaper
Bjp To Protest Against Saamana NewspaperSaam Tv

Bjp To Protest Against Saamana Newspaper: देवेंद्र फडणवीस उप झाल्याने वैफल्यग्रस्त झाल्याची टीका ठाकरे गटाचं मुखपत्र सामानातून करण्यात आली होती. त्यामुळे भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. भाजपने मुंबई येथील नरिमन पॉईंट येथे ठाकरे गटाच्या मुखपत्राविरोधात जोरदार आंदोलन केलं आहे.

पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. दुरीकडे प्रभादेवी येथे सामानाच्या कार्यालयाबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र आहे.

Bjp To Protest Against Saamana Newspaper
Maharashtra Politics : सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री बदलाचा दावा; मंत्री छगन भुजबळ यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले...

फडणवीस यांच्यावर सामना अग्रलेखातून काय करण्यात आली टीका?

आजच्या सामना अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत लिहिण्यात आलं आहे की, ''देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे.''  (Latest Marathi News)

यात पुढे लिहिण्यात आलं आहे की, ''अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. ‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस, सांभाळा.''

Bjp To Protest Against Saamana Newspaper
Vijay Wadettiwar Statement : प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत CM एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला जाणार, विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

दरम्यान, सामानाच्या अग्रलेख विरोधात भाजप कार्यक्रते आक्रमक झाले असून राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. या अग्रलेख विरोधात पोलिसात तक्रार नोंदवणार असल्याचं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com