Malvani Police station  Saam TV
मुंबई/पुणे

Bangladeshi Arrest in Mumbai : अवैधरित्या मुंबईत राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकाला अटक, मालवणी पोलिसांची कारवाई

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai News : भारतात घुसखोरी करून अवैधरित्‍या मुंबईच्या मालवणी परिसरात राहणार्‍या घुसखोर बांग्लादेशी नागरिकास अटक मालवणी पोलिसांच्या एटीसी पथकाने अटक केली आहे. नागे रोकोन सादीक सिकदार (४१ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोराचे नाव आहे. तो वैध कागदपत्रांविना ओळख लपवत छुप्‍या मार्गाने भारत-बांगलादेश सीमेवरून भारतात येऊन मालवणी मालाड भागात वास्‍तव्‍य करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, १३ जून रोजी मालवणी पोलीस ठाण्याच्या एटीसी पथकाचे अधिकारी API शिवशंकर भोसले यांना गुप्त बातमीदाराकडून मालवणी फायर ब्रिगेडजवळ, जनकल्याण नगर गेट नं. १ मालवणी परिसरात एक घुसखोर बांग्लादेशी नागरिक येणार असल्याची खबर मिळाली होती. परिमंडळ-११ चे पोलीस उपआयुक्त अजयकुमार बंसल याचे मार्गदर्शनाखाली मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी तपास पथक तयार केले. (Latest Marathi News)

एटीसी. पथकाचे स.पो.नि. शिवशंकर भोसले, पो.ना.सचिन पवार, पो. शि.निलेश कुरबुडे, पो.शि. निखील जाधव, पो.शि. विशाल भामरे यांनी खबऱ्याने सांगितलेल्या ठिकाणावर सापळा रचला. एक संशयित व्यक्ती आल्यानंतर खबऱ्याने केलेल्या इशान्यानंतर संशयित व्यक्तीस ताब्यात घेऊन मालवणी पोलीस ठाणे येथे आणून चौकशी केली. चौकशी दरम्यान पोलिसांनी त्या व्यक्तीकडे भारतीयत्व सिद्ध करणारे कागदपत्र मागितले असता त्याच्याकडे असले कोणतेही कागदपत्र आढळून आले नाही. अधिक चौकशी केली असता तो बांगलादेशातील जेशोर जिल्ह्यातील नडाईल बाजग्राम येथील रहिवासी असल्याचे समजले. (Crime News)

भारतात प्रवेश करण्यासंबंधीच्या कोणत्याही वैद्य कागदपत्रांशिवाय तसेच भारत सरकारने विहीत केलेल्या मार्गाव्यतिरिक्त तसेच भारत-बांग्लादेश सीमावरील स्थानिक मुलकी अधिकारी यांचे परवानगी शिवाय बांग्लादेशातून भारताच्या सरहद्दीमध्ये प्रवेश करून अनधिकृतपणे घुसखोरी केली म्हणून त्याचे विरुध्द कलम ३ सह ६ पारपत्र भारतात प्रवेश १९५० परिच्छेद ३ (१) परकिय नागरीक आदेश १९४८ सह कलम १४ परकीय नागरीक कायदा १९४६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT