Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: धक्कादायक! पुण्यात प्रसिद्ध बिल्डरकडून तरुणीवर बलात्कार

मागील काही काळापासून पुण्याबरोबरच महाराष्ट्रात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: मागील काही काळापासून पुण्याबरोबरच महाराष्ट्रात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. राज्यात काही कोपऱ्यातून दररोज महिलांवर बलात्काराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असे असताना देखील पुण्यातून (Pune) महिला बलात्काराची खळबळजनक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने एका तरुणीला लग्नाचे आमिष (marriage) दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केला आहे. (Crime Famous builder sexual assualt girl in Pune)

हे देखील पहा-

या प्रकरणी पीडित तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी (police) बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. भारत देसडला असे गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. गेल्या काही काळापासून आरोपी बिल्डरने वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या घटनेचा सविस्तर तपास पोलीस करत आहे.

आरोपी भारत देसडला हे पुण्यात प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक म्हणून ओळखले जातात. याबरोबरच आरोपी देसडला हे अलीकडेच घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्वागत अध्यक्ष देखील होते. देसडला यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने साहित्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. आरोपी देसडला हे पुण्यातील प्रसिद्ध रोहन बिल्डर्सचे भागीदार आणि संचालक आहे. आरोपी बिल्डरने गेल्या काही दिवसापासून पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला आहे.

दरम्यान पीडित तरुणीने लग्नासाठी विचारणा केली असता, आरोपीने लग्नाला नकार दिला आहे. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडित तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढे पोलीस कोणतीही कारवाई करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

चर्चा फिस्कटली पुन्हा युद्ध पेटणार? ट्रम्पनंतर नेत्यानाहूंचाही आक्रमक पवित्रा

SCROLL FOR NEXT