Anil Deshmukh vs Devendra Fadnavis Saam tv
मुंबई/पुणे

Anil Deshmukh vs Devendra Fadnavis: अनिल देशमुख पुन्हा अडचणीत; सीबीआयकडून आणखी एक गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

Vishal Gangurde

सुनील काळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पुन्हा सीबीआयने गुन्हा नोंदवला आहे. अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या कथित वसुलीचा आरोप असून ते याच प्रकरणात जामीनावर बाहेर आहेत. आता देखमुख यांच्यावर पुन्हा गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. अनिल देशमुख यांनी 'एक्स' मीडियावर पोस्ट करत याबााबत माहिती दिली. त्यानंतर या पोस्टमधून अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अजिबात घाबरणार नसल्याचे म्हणत अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. यावेळी धन्यवाद, देवेंद्र फडणवीस म्हणत देशमुखांनी त्यांच्यावर उपरोधिक टोला लागवला आहे.

अनिल देशमुख काय म्हणाले?

अनिल देशमुख पोस्ट करत म्हणाले, 'आज माझ्यावर सीबीआयकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेलाय. जनतेचा कौल बघून देवेंद्र फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झालं आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता- न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे'.

'महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांकडून (Devendra Fadnavis) किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे, असे देशमुख म्हणाले.

दरम्यान, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. देशमुखांवर आणखी एक गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुखांनी आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस काय प्रत्युत्तर देतात, हे पाहावे लागेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : या राशीच्या व्यक्तींचे निर्णय योग्य ठरेल, नव्या दमाने कामाला लागाल, वाचा आजचे राशीभविष्य

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? आज रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

Rashi Bhavishya : मेषसह 5 राशींच्या भाग्यात होणार मोठा बदल, वाचा राशीभविष्य

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT