BMC Covid Scam Update News SAAM TV
मुंबई/पुणे

Covid Centre Scam: BMC अधिकाऱ्यांना वाटली ६० लाख रुपयांची सोन्याची बिस्कीटे अन् नाणी; 'कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीचा मोठा दावा

जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ईडीने न्यायालयाने दाखल केलेल्या आरोप पत्रात धक्कादायक खुलासे केले आहेत.

Gangappa Pujari

Covid Centre Scam:

कोरोना काळात १०० कोटी रुपयांचा जम्बो कोविड सेंटरच्या साहित्य खरेदीत मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता महत्वाची माहिती समोर आली असून ईडीने न्यायालयाने दाखल केलेल्या आरोप पत्रात धक्कादायक खुलासे केले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील कोविड केंद्रात बेकायदा आर्थिकव्यवहार प्रकरणात ईडीने आठ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये या कॉन्ट्रक्टचा मोबदला म्हणून बीएमसी अधिकारी आणि नेत्यांना 60 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या गोल्ड बार, सोन्याची बिस्किटे आणि नाणी देण्यात आल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

तसेच दहिसर जंबो कोविड -19 केंद्रात 100 टक्के कर्मचारी असल्याचे भासवले गेले मात्र प्रत्यक्षात सुमारे 50 टक्केच कर्मचारी कमी तैनात होते, ज्यामुळे कोविड काळात रुग्णांना भेट देणाऱ्या वैद्यकीय कर्मचार्‍यांवर कामाचा मोठा ताण पडत होता, असाही दावा ईडीच्या या आरोपपत्रामध्ये केला आहे.

तसेच जुलै 2020 ते फेब्रुवारी 2022 या काळात वरळी आणि दहिसर या दोन कोविड सेंटरमध्ये अनियमितता झाल्याचे ईडीने सांगितले आले. या कालावधीत 32.44 कोटी रुपये बेकायदेशीररित्या कमावले गेले. शुक्रवारी विशेष न्यायालयाने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचीही दखल घेतली. ज्यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वडापावमध्ये आढळले प्लास्टिकचे तुकडे

Home Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार घराच्या दरवाज्यांना कोणता रंग द्यावा?

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

SCROLL FOR NEXT