Pune Crime News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: लॉजवर नेऊन मामाच्या पोरीवर अत्याचार; आत्येभावाचं क्रूर कृत्य

नात्याने मामाची मुलगी असलेल्या एका २५ वर्षीय तरुणीवर आत्येभावानेच बलात्कार केला.

साम टिव्ही ब्युरो

Pune Crime News : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनेत मोठी वाढ होत आहे. एकीकडे पुण्यात कोयता गँग दहशत माजवत असताना दुसरीकडे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नात्याने मामाची मुलगी असलेल्या एका २५ वर्षीय तरुणीवर आत्येभावानेच बलात्कार केला. त्यानंतर तिचे अश्लिल फोटो व्हायरल केले. पुण्यातील येरवडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे. सिधलिंगप्पा (वय २९) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिधलिंगप्पा हा मूळ कर्नाटक येथील रहिवासी असून तो पुण्यातील वडगाव शेरी परिसरात राहतो. पीडित तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी हा तिच्या आत्याचा मुलगा आहे.

आरोपी सिधलिंगप्पा याने अनेकवेळा पीडित तरुणीकडे लग्नाची मागणी करत होता. तसेच तो शारीरिक संबंधाची देखील करत होता. असे न केल्यास त्या महिलेला लग्न जमवून अनेक वेळा शरारिक संबंध ठेवण्याची मागणी करत होता, असे न केल्यास लग्न न करण्याची धमकी देत होता.

सप्टेंबर २०२१ मध्ये आरोपी हा पीडित तरुणीला त्याच्या मूळगावी कर्नाटक येथे घेऊन गेला. तेथे त्याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आरोपीने पुण्यात आल्यानंतरही एका हॉटेवर नेत पीडितेवर अत्याचार केले.

आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेसोबत शारिरीक संबंध ठेवताना तिचे व्हिडीओ देखील काढले. ते जवळच्या मित्रांना तसेच नातेवाईकांना पाठवले. दरम्यान, पीडितेने यावर विचारणा केली असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या संपूर्ण प्रकारला वैतागून पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली.

याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पुण्यातील येरवडा पोलिसांनी आरोपीविरोधात दंडात्मक कलम ३७६, ३७६ (२), ५०६ अशा विविध कलमान्वे गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT