couple dies in apta rail accident Saam TV
मुंबई/पुणे

Accident: रेल्वे अपघातात जगताप दाम्पत्य ठार; आपटा गावावर शाेककळा

ग्रामस्थांनी नदी पात्रात उतरुन बचाव कार्य सुरु केले परंतु त्यापुर्वीच दाेघांचा मृत्यू झाला हाेता.

विकास मिरगणे

पनवेल : पेण रेल्वे मार्गावरील रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आपटा स्टेशनपासून काही अंतरावर सारसईकडे जाणाऱ्या पूलावरून आपटा (apta rail accident) येथील पती - पत्नी आज (सोमवार) सकाळी कामानिमित्त जात असताना त्यांचा रेल्वे (railway) अपघात (accident) झाला. यामध्ये दाेघे नदी पात्रात पडून मृत्यूमुखी पडले.

हा अपघात झाल्याचे समजताच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे अभिजीत घरत, अमित गुजरे, अरूण म्हापणकर , राजेश पारठे, भक्ती साठेलकर, गुरुनाथ साठेलकर , अमोल ठकेकर यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ (villagers) मयुर वाडेकर यांनी नदी पात्रात उतरुन बचाव कार्य सुरु केले परंतु त्यापुर्वीच दाेघांचा मृत्यू झाला हाेता.

या अपघातात (railway accident) योगेश खंडू जगताप ‌व त्यांची पत्नी रजनी अशी मृत्यूमुखी पडलेल्या पती-पत्नींचे नावे आहे. हे दोघे आपटा येथील रहिवासी हाेती. या घटनेने आपटा गावावर शोककळा पसरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayaji Shinde : झाडं आमचे आई-बाप, त्यांच्यावर हल्ला झाल्यास गप्प बसणार नाही; सयाजी शिंदेंने संतापले

महिला शिक्षकाची वाट अडवली; दोघांनी मिळून कपाळावर गोळी झाडली, भरदिवसा रक्तरंजित थरार

Nitesh Rane: तपोवनातल्या वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का? राणेंचा सवाल, शिरसट म्हणाले...

मुंबई-गोवा महामार्गाचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार? नव्या डेडलाइनची घोषणा

Paneer Roll: मुलांच्या डब्यासाठी बनवा पौष्टिक पनीर रोल; सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT