सांगली : गेल्या दोन महिन्यात विटा आणि परिसरात अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेकांचे यात प्राण गेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते शंकर नाना मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सर्व सामाजिक सेवा संस्था एकत्र येऊन गेल्या पंधरा दिवसापूर्वी प्रशासनास निवेदन दिले होते. यामध्ये शाळा (school) व गर्दी रहदारी असणारे ठिकाणी रुलिंग पट्टे मारावेत व काही ठिकाणी गतिरोधक बसवावेत अशा पद्धतीचे निवेदन देण्यात आले होते. परंतु त्याची दखल घेतली नाही.
त्यामुळं कासव गतीच्या व ढिम्म प्रशासनाने यावर कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने आज (साेमवार) शंकर नाना मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सर्व सामाजिक सेवा संस्था व जनतेने मोठ्या प्रमाणात एकत्र येत विट्यात (vita) रास्ता रोको केला.
रमलींग पट्टे मारलेश्वर आम्ही इथून उठणार नाही अशी एक ठाम भूमिका घेऊन आंदोलक रास्ता रोखून होते. याप्रसंगी आंदाेलकांची आणि पोलिसांची (police) बाचाबाची व झटापट झाली. परंतु आंदोलक काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कोणतेही आश्वासन नको ताबडतोब डब्लिंग पट्ट्याने गतिरोधकाची काम सुरू करा आग्रही भूमिका ते ठाण मांडून रस्त्यावर बसले होते.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.