महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध? आज नवी नियमावली जाहीर होणार Saam Tv
मुंबई/पुणे

महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध? आज नवी नियमावली जाहीर होणार

लग्न समारंभ आणि इतर सोहळ्यांमध्ये गर्दी टाळण्यावर सरकारचा भर

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर काल (२३ डिसेंबर) टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत लक्षात घेता कमीतकमी गर्दी कशी होईल त्यासोबाबतच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने या बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली. याबाबत आज (२४ डिसेंबर) नवी नियमावली जाहीर होणार आहेत.

हे देखील पहा -

या बैठकीत इतर राज्यांनी लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ. अजित देसाई, डॉ. राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुण्यात गोळीबाराचा थरार; महिलांसह तिघांवर गुन्हा

Eating Curd At Night: उन्हाळ्यात रात्री दही खावा की नाही?

Homemade Rice Cream For Face: चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? घरच्या घरी बनवा तांदळाची सोपी क्रिम

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये पुन्हा कारला आग; पार्किंग माफियावर संशय

Sunday Horoscope: कामाचा ताण वाढेल, ५ राशींनी खर्चावर नियंत्रण ठेवा; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT