Corona in Maharashtra SAAM TV
मुंबई/पुणे

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक; अशी आहे ताजी आकडेवारी

मुंबई शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणत वाढत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: काही दिवसापासून कोरोना (Corona) रुग्णात घट झाली होती. आता पुन्हा महाराष्ट्रात कोरोनाने डोक वर काढलं आहे. राज्यात बुधवार १ जून रोजी, १,०८१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर सक्रीय रुग्णांची संख्या ४,०३२ वर पोहोचली आहे. दिवसभरात ५२४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्णांची संख्या ७७,३६,२७५ झाली आहे. राज्यातील बरे होण्याचा दर ९८.०७% आहे. राज्यातील मृत्यूचे प्रमाण १.८७% आहे.

आजपर्यंत ८,०९,५१,३६० नमुन्यांपैकी ७८,८८,१६७ चाचणी पॉझिटिव्ह आले आहेत. एका मुंबई शहरात आज एका दिवसात ७३९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहेत. यातील २९ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं असून ११ रुग्ण अत्यवस्थ आहेत.(Corona Cases In Maharashtra)

राज्यातील रुग्णांची आकडेवारी

मुंबई विभागात- ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, मीरा भाईंदर, पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल या शहरांचा समावेश आहे. या विभागात ९६२ नव्या रुग्णांची (Corona) नोंद झाली आहे.

नाशिक विभागात - यामध्ये नाशिक, नाशिक एमसी, मालेगाव एमसी, अहमदनगर, अहमदनगर एमसी, धुळे, धुळे एमसी, जळगाव, जळगाव एमसी, नंदुरबार यांचा समावेश आहे, या विभागात ७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

पुणे विभागात- यात पुणे, पीएमसी, पीसीएमसी, सोलापूर, सोलापूर एमसी, सातारा यांचा समावेश आहे. या विभागात ८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

कोल्हापूर विभागात- कोल्हापूर, कोल्हापूर एमसी, सांगली, सांगली एमसी, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात आज ४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.(Corona Latest News)

औरंगाबाद विभागात- औरंगाबाद, औरंगाबाद एमसी, जालना, हिंगोली, परभणी, परभणी एमसी या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात २ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

लातूर विभागात- लातूर, लातूर एमसी, उस्मानाबाद, बीड, नांदेड, नांदेड एमसी, या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात नव्या १ रुग्णाची नोंद झाली आहे.

अकोला विभागात- अकोला, अकोला एमसी, अमरावती, अमरावती एमसी, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे, या विभागात २ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

नागपूर विभागात- नागपूर, नागपूर एमसी, वर्धा, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर, चंद्रपूर एमसी, गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो, या विभागात १५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

(Corona Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

GK: 'या' देशात विद्यार्थी स्वतः शौचालये स्वच्छ करतात

HBD Ranveer Singh : वाढदिवस अन् सर्व इन्स्टाग्राम पोस्ट डिलीट; रणवीर सिंहचं नेमकं चाललंय तरी काय?

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

SCROLL FOR NEXT