New Corona Rules: सलून, जिमसाठी राज्यात पुन्हा नवे नियम; जिम पुन्हा सुरु तर... saam tv
मुंबई/पुणे

New Corona Rules: सलून, जिमसाठी राज्यात पुन्हा नवे नियम; जिम पुन्हा सुरु तर...

नमूद केलेले प्रस्तावित निर्बंध हे लागू निर्बंध म्हणून समजले जातील.

सुमित सावंत

पुणे : राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण 8 जानेवारी 2022 च्या आदेशात खालील आंशिक बदल जारी केले जात असून, 10 जानेवारी 2022 रोजी पासून 12 वाजल्यापासून लागू होतील आणि कोणताही नवीन आदेश जारी होईपर्यंत अंमलात राहतील.

1. नमूद केलेले प्रस्तावित निर्बंध हे लागू निर्बंध म्हणून समजले जातील.

2. सौंदर्य सलूनसाठी टेबलमध्ये नमूद केलेल्या निर्बंधांच्या अधीन राहून 50 टक्के क्षमतेसह उघडे राहण्याची परवानगी दिली जाईल . सोलून मध्ये मास्क काढता येणार नाही अश्याच सेवा सुरु राहतील. फक्त अशाच कामांना परवानगी असेल ज्यांना कोणाला मास्क काढण्याची गरज नाही. केवळ पूर्ण लसीकरण (Vaccination) झालेल्या व्यक्तींनाच या सेवा वापरण्याची परवानगी असेल. सलून मधील कर्मचारी पूर्णपणे लसीकरण केलेले असतील.

3. कोणतीही गतिविधी करताना मास्क वापरण्याच्या अटीवरच 50 टक्के क्षमतेसह जिम उघड्या ठेवण्याची परवानगी आहे. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवा वापरण्याची परवानगी असणार आहे. जिमचे सर्व कर्मचारी पूर्णपणे लसीकरण केलेले असतील. असे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

दरम्यान राज्यात काल नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आजपासून ते निर्बंध लागू होतील असे सरकारकडून सांगण्यात आले होते. परंतु जिम मालक आणि सलून वाल्यांनी याला विरोध केल्यानंतर राज्यसरकारने या नियमांमध्ये शिथिलता दिलेली आहे. राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण, ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: बॉम्बे की मुंबई? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, VIDEO

Chana Koliwada: स्ट्रीट स्टाइल चटपटीत चना कोळीवाडा, संध्याकाळची भूक मिनिटांत गायब

Maharashtra Live News Update: पुणे शहराला लवकरच मिळणार ५ नवीन पोलिस ठाणे

Food Safety Tips: कोणत्या भाज्या पुन्हा गरम करून खाऊ नयेत? अन्यथा...

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आणखी एक राजकीय भूकंप; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा समर्थकांसह राजीनामा

SCROLL FOR NEXT