MLA Shahajibapu Patil
MLA Shahajibapu PatilSaam TV

सरकारमध्ये विचारलं देखील जात नाही; शिवसेना आमदारांनी व्यक्त केली नाराजी

राज्यात काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी आणि शिवसेना (Shivsena) महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे अनेक इच्छुकांची मंत्रीपदाची संधी हुकली आहे.
Published on

पंढरपूर: माढा लोकसभा मतदारसंघातील एकाही आमदाराला मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला साध विचारलं देखील जात नाही. घर की कोंबडी दाल बराबर असं म्हणत सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यात काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी आणि शिवसेना (Shivsena) महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे अनेक इच्छुकांची मंत्रीपदाची संधी हुकली आहे. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार श्री. पाटील यांनी देखील आपल्याला मंत्रीपद न मिळाल्याने उघड नाराजी व्यक्त केली.

MLA Shahajibapu Patil
यवतमाळ जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या; एकाची हत्या असल्याचा आरोप

पंढरपूर येथील एका खासगी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार श्री. पाटील यांनी मनातील खदखद व्यक्त केली. आमदार श्री. पाटील म्हणाले की, मी पहिल्यांदाच शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून आलो. त्यामुळे मला पहिल्यांदाच लांब राहायला सांगितलं होतं. त्यामुळे मला वाटत नाही या सरकामध्ये आमचं कोणी ऐकेल. आमचा कोण विचार करेलं असही आता वाटत नाही. असं म्हणत आपल्या सरकारला त्यांनी घरचा आहेर दिला आहे. यापूर्वीही आमदार पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आमदार पाटील यांचे भाजप नेत्यांशी इतर नेत्यापेक्षा चांगले सख्य आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com