Covid vaccination  Saam Tv
मुंबई/पुणे

कोरोनावर मात करण्यासाठी BMC 'हर घर दस्तक' मोहीम राबविणार

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरात सदर वयोगटासाठी 'हर घर दस्तक' ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यासहित मुंबईत करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे राज्यात आरोग्य विभागाने पुन्हा मास्क घालण्याचा सूचना दिल्या आहेत. दुसरीकडे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी विशेषत: १२ ते १४ आणि १५ ते १७ वर्ष वयागटातील मुले- मुलींचे लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेचे (BMC) आरोग्य कर्मचारी सज्ज झाले आहेत. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरात सदर वयोगटासाठी 'हर घर दस्तक' ही मोहीम राबविण्यात येणार आहे. घराजवळच्या कोविड लसीकरण ( Covid Vaccination) केंद्रावर जाऊन पात्र व्यक्तींनी लस घेण्याचे नागरिकांना मार्गदर्शन या मोहीमेअंतर्गत करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ३१ जुलै २०२२ पर्यंत ' हर घर दस्तक' मोहीम सुरु राहणार आहे. ( Covid Vaccination News In Marathi )

हे देखील पाहा -

मु्ंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रात १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मुंबईत लसीकरणासाठी अनेकांनी रांगा लावत लसीकरण पूर्ण केले आहे. आतापर्यंत १८ वर्ष वयावरील सर्व पात्र नागरिकांचे पहिल्या मात्रेचे ११२ टक्के आणि दुसऱ्या मात्रेचे १०१ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत १८ वर्ष वयावरील सर्व पात्र नागरिकांचे पहिल्या मात्रेचे ११२ टक्के व दुसर्‍या मात्रेचे १०१ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे. १५ ते १७ वर्षे आणि १२ वर्षे ते १४ वर्षातील लाभार्थ्यांचा लसीकरण करण्याला अनुक्रमे ३ जानेवारी २०२२, १६ मार्च २०२२ मान्यता मिळाली आहे. सध्या मुंबई महानगरपालिका व शासकीय रुग्णालयात १०७, खासगी रुग्णालयात १२५ रुग्णालयात अशी एकूण ३२३ कोविड-१९ लसीकरण केंद्रे कार्यन्वित आहेत. मुंबईत १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यांचे पहिल्या मात्रेचे २८ टक्के व दुसऱ्या मात्रेचे १२ टक्के लसीकरण झाले आहे. तसेच १५ ते १७ वयोगटातील लाभार्थ्यांचे पहिल्या मात्रेचे २८ टक्के व दुसऱ्या मात्रेचे ४५ टक्के लसीकरण झालेले आहे. या लाभार्थ्यांचे लसीकरण हे १८ वर्षांवरील पात्र नागरिकांच्या वरील वयोगटातील लसीकरण हे अत्यंत कमी आहे. त्यामुळे या वयोगटातील लाभार्थ्यांसाठी सरकारने कडक पावले उचलली आहेत.

राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याने तज्ज्ञांकडून कोविड संसर्गाच्या चौथ्या लाटेचा संभाव्य शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मुंबईत १ जून ते ३१ जुलै पर्यंत 'हर घर दस्तक मोहीम २' राबविण्यात येत आहे. वृद्धाश्रमातील व इतर वरिष्ठ नागरिक (६० वर्ष व अधिक) यांना बूस्टर डोस देण्याकरिता कार्यवाही केली जाणार आहे. या मोहिमेत महानगरपालिकेच्या आरोग्य कर्माचाऱ्यामार्फत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येत आहेत. तसेच लसीकरण केंद्र जाण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. दरम्यान,मुंबईतील सर्व पात्र नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावे. त्याचप्रमाणे आपल्या पात्र पाल्यांचे देखील लसीकरण पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी नागरिकांना केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hydrogen Railway: देशात लवकरच येणार हायड्रोजनवर चालणारी रेल्वे; वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या

Pune News : मुलांची परीक्षा फी भरली, आयोगानं थेट उमेदवाराला पाठवली नोटीस!

Almond Milk: बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

ITBP Recruitment: १२ वी पास तरुणांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना ९२००० रुपये पगार, अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT