मुंबई : कॉर्डेलिया क्रूझवरील एकूण १ हजार ८२७ प्रवाशांची कोविड तपासणी करण्यात आली होती. दोन वैद्यकीय प्रयोगशाळांनी या सर्वांची चाचणी केली होती. त्यापैकी १ हजार ८२७ पैकी, एकूण १३९ जण कोविड बाधित असल्याचे अहवाल आज (५ जानेवारी २०२२) रात्री प्राप्त झाले आहेत. कॉर्डेलिया क्रुझ (Cordelia Cruise) काल (४ जानेवारी २०२२) सायंकाळी ग्रीन गेट येथे आल्यानंतर त्यावरील ६० बाधित रुग्णांना भायखळा येथील रीचर्डसन आणि क्रुडास जम्बो कोविड केंद्र, (Cowid Centre) सेंट जॉर्ज शासकिय रुग्णालय आणि इतर विविध हॉटेल्समध्ये यापूर्वीच दाखल केले आहे.
त्यानंतर, जहाजावरील एकूण १ हजार ८२७ प्रवाशांची कोविड (Corona) तपासणी करून, त्यांच्या स्वॅबचे नमुने २ वैद्यकीय प्रयोगशाळेमार्फत घेण्यात आले होते. महानगरपालिकेच्या A विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी व त्यांचे सहकाऱ्यांनी प्रवाशांची तपासणी करण्याची कार्यवाही पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु होती.
हे देखील पहा -
महापालिका (BMC) आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, सहआयुक्त (परिमंडळ १) श्री. रणजित ढाकणे, ए विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी) श्री. शिवदास गुरव व त्यांचे सहकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) प्राजक्ता आंबेरकर यांनी आवश्यक ते सर्व नियोजन व व्यवस्था केली आहे. बाधित रुग्णांच्या वाहतुकीसाठी १७ आसनी क्षमतेच्या ५ रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. ज्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत, अशा सर्व रुग्णांना ७ दिवस गृह अलगीकरण सक्तीचे केले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आलेला आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.