Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics: ठाकरे-काँग्रेसचं फाटलं? पत्रकार परिषदेत मविआतला विसंवाद चव्हाट्यावर; VIDEO

Satish Kengar

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

मविआत अडीचशेपेक्षा जास्त जागांवर सकारात्मक चर्चा झाली असली तरी २५-३० जागांच्या तिढ्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटातला वाद विकोपाला गेलाय. काँग्रेसमुळे मविआचं जागा वाटप अडल्याचा जाहीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आणि मविआंतला वाद चव्हाट्यावर आला. राऊतांनी थेट काँग्रेसच्या राज्यातल्या नेतृत्वाच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं. संजय राऊत म्हणले होते की, काँग्रेसच्या कमिट्यांमुळे जागा वाटपाला उशीर होत आहे.

त्यानंतर काही वेळात मविआची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या परिषदेत राऊतांच्या या आरोपांवर विचारलेल्या प्रश्नाला नाना पटोलेंनीही त्यांच्या सडाफटींग शैलीत भर पत्रकार परिषदेत जोरदार उत्तर दिलं. मात्र हे अंगाशी येणार असल्याची जाणीव होताच ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई आणि जितेंद्र आव्हाड यांनी पटोलेंना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी मविआतला हा विसंवाद चव्हाट्यावर आला.

मात्र संतापलेल्या ठाकरे गटानं नाना पटोलेंची थेट काँग्रेसच्या हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. काँग्रेस आणि ठाकरे गटात का फाटलं याची काही कारणं जाणून घेऊ...

पटोलेंमुळे काँग्रेस आणि ठाकरेचं फाटलं?

तडजोड करत नसल्यानं पटोलेंविरोधात ठाकरे गटाची हायकमांडकडे तक्रार.

पटोले असल्यास मविआच्या बैठकीला न येण्याची ठाकरे गटाची भूमिका.

विदर्भातील जागांवरून पटोलेंवर आडमुठ्या भूमिकेचा आरोप.

रामटेक, अमरावती, दक्षिण विदर्भाच्या जागेवरून रस्सीखेच.

लोकसभेत ठाकरे गटानं रामटेक, अमरावती काँग्रेसला सोडल्या.

विधानसभेत काँग्रेसनं या 3 जागांवर सहकार्य करण्याची ठाकरे गटाची अपेक्षा.

मुंबईतील काही जागांवर दोघांनीही आक्रमक भूमिका घेतल्यानं तिढा.

ऐन जागावाटपाची यादी जाहीर होण्यापूर्वी मविआतला वाद विकोपाला गेलाय. आता काँग्रेस हायकमांड आणि शरद पवार यात मध्यस्थी करून वाद सोडणावर ...की हा वाद आणखी टोकाला जाऊन थेट जागावाटपावरच परिणाम होणार याकडे लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाची सोमवारी ८० उमेदवारांची यादी जाहीर होणार

Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल

Eknath Shinde : CM शिंदे थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्ता कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

VIDEO : अजित पवारांचा शिंगणे यांना फोन; नाराजी दूर करण्याचा अजितदादांचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT