Ulhas Bapat, Eknath Shinde, Maharashtra Politics, Maharashtra, Uddhav Thackeray, Devendra Fandnavis Saam TV
मुंबई/पुणे

'...तर काेणीच मुख्यमंत्री बनणार नाही, राष्ट्रपती राजवट लागेल'

राज्यातील सध्याची संपूर्ण परिस्थिती बघता, महाविकास आघाडी सरकारला धोक्यात असल्याचे चित्र आहे.

गोपाल मोटघरे

पुणे : नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) त्यांच्या समवेत शिवसेनेचे (Shivsena) माेठ्या संख्येने आमदार असल्याचा दावा करीत बंड पुकारले आहे. शिंदे हे सूरतहून (surat) गुवाहटीस रवाना झाले आहेत. सध्या महाराष्ट्राचे सरकार काेसळेल अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान या सर्व गाेष्टींबाबत घटनाकार उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी नियमाप्रमाणे आगामी काळात राज्यातील सरकारचे (maharashtra government) काय हाेऊ शकते, नवा मुख्यमंत्री हाेईल का, राष्ट्रपती राजवट लागू हाेईल का याबाबत महत्वाची माहिती साम टीव्हीशी चर्चा करताना सांगितली आहे. (maharashtra politics latest marathi news)

बापट म्हणाले शिवसेनेचे 55 आमदार आहेत. त्यापैकी एकनाथ शिंदे यांना 37 अथवा त्यापेक्षा जादा आमदारांचा पाठिंबा असेल तर त्यांच्याकडे बहुमताचा आकडा असल्याचे स्पष्ट हाेईल. त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायदा प्रमाणे अपात्र ठरणार नाहीत. दरम्यान मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला आणि सरकार पडले तर राज्यपाल विराेधकांना (देवेंद्र फडणवीस) सत्ता स्थापनेची संधी देतील.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाही म्हटल्यास तर काेणीच मुख्यमंत्री हाेऊ शकणार नाही. राज्यपाल राष्ट्रपती यांच्याकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करतील. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू हाेऊ शकेल. त्यानंतर राज्यात सहा महिन्यांत निवडणूका घ्याव्या लागतील (ताे कार्यकाळ वाढवता पण येताे). राज्यपाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते रूग्णांलयातून कारभार पाहू शकतील असेही बापट यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Video : माकडीण दारूच्या दुकानात गेली, व्होडकाची बाटली फोडली अन् घटाघटा प्यायली, नंतर जे घडलं ते पाहून सगळेच शॉक

Siddharth Jadhav: रहस्यमय प्रवास अन् निस्सीम भक्ती; 'बजरंगी'मधील सिद्धार्थ जाधवचा जबरदस्त लुक पाहिलात का?

Guava vs Banana: पेरू की केळी? कोणतं फळ खाल्ल्याने मिळतं जास्त पोषण

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरेंची विजयकुमार घाडगेंच्या उपोषणाला भेट

Chikankari Kurti Designs: महिलांसाठी चिकनकारी कुर्तीचे 5 युनिक डिझाईन्स; ऑफिस आणि डेलीवेअर लूकसाठी एकदम परफेक्ट

SCROLL FOR NEXT