baramati by election : Saam tv
मुंबई/पुणे

Explainer : बारामतीत काँग्रेसची पॉवरफुल खेळी; सुनेत्रा पवारांच्या विरोधात अर्ज माघार घेऊन काय मिळवलं?

baramati by election : बारामतीत काँग्रेसची पॉवरफुल खेळी चर्चेत आली आहे. काँग्रेसने सुनेत्रा पवारांच्या विरोधात अर्ज माघार घेऊन काय मिळवलं, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Vishal Gangurde

बारामतीत राजकीय घडामोडींना वेग

पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार

काँग्रेसच्या भूमिकेची राज्यभरात चर्चा

बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बारामतीत पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी अर्ज मागे घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांना कॉल केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी काँग्रेसला सहकार्य करण्याची विनंती केली.

सुनेत्रा पवार यांनी स्वत: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भेट घेतली. तर रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन पार्थ पवार यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी अजित पवारांच्या कार्याचा उल्लेख करत अर्ज माघार घेण्याची भूमिका घेतली.

बारामतीच्या मैदानात न उतरता देखील काँग्रेसला फायदा झाला आहे. पार्थ पवारांनी काँग्रेसवर टीका केली होती. परंतु टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसलाच नरमाईची भूमिका घेतली. सुप्रिया सुळे देखील म्हणाल्या की, 'पवार कुटुंब आणि काँग्रेसचे नाते जुनं आहे. फक्त विचारधारेपर्यंत मर्यादित नाही'.

दुसरीकडे जय पवार यांनी देखील काँग्रेसचे आभार मानले. जय पवार म्हणाले, 'अजित पवारांनी नेहमी विकासाच्या मुद्यावर राजकारण केलं आहे. बिनविरोध निवडणूक होणे हीच त्यांनी खरी श्रद्धांजली ठरेल' . बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत २३ अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याचेही स्पष्ट झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवली रेल्वे स्थानकातून राजू पाटील शेकडो मनसैनिकांसह ट्रेनने मुंबईकडे रवाना

मोदी सरकारचं गिफ्ट! ५ टक्के व्याजावर ३ लाखांचं कर्ज; काय आहे सरकारची योजना, कोण घेऊ शकतो लाभ?

Gold Price Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल; 18, 22 आणि 24 कॅरेट किती रुपयांनी स्वस्त? आताच घ्या जाणून

'दृश्यम' चित्रपट पाहिला, २००० किमी प्रवास केला अन्…; बापाला संपवल्याचा रचला बनाव, पण एका कॉलने सगळा प्लॅन उधळला

BJP: भाजपला मोठा झटका! दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT