Eknath Shinde Devendra Fadnavis  saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : 'उद्योगधंद्यांपाठोपाठ मुंबईही गुजरातला देऊन टाकतील'

'शिंदे-फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पाठवत आहेत'.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने केंद्रातील मोदी सरकार गेल्या आठ वर्षांपासून काम करत आहे. राज्यात सत्ताबदलानंतर आलेले शिंदे-फडणवीस (Eknath Shinde सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पाठवत आहेत. एक दिवस हे सरकार मुंबईही गुजरातला देऊन टाकतील. महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातचे हित जोपासणारे शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रद्रोही आहेत हे स्पष्ट झाले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, 'महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. देशातील सर्वात जास्त मोठे उद्योग महाराष्ट्रात आहेत. गुजरात महाराष्ट्राच्या मागे आहे, याचे शल्य पंतप्रधान मोदींना आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प आणि संस्था गुजरातला हलवण्याचा सपाटा लावला आहे'.

'दुर्देवाने यापूर्वीचे फडणवीस आणि आताचे ईडी सरकार या दोन्ही सरकारांनी महाराष्ट्राचे हित डावलून मोदींच्या गुजरातच्या हिताला जास्त महत्व दिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, पालघर येथील प्रस्वातील मरीन अकादमी, मुंबईतील डायमंड बोर्स असे अनेक महत्वाचे प्रकल्प गुजरातला गेले.'

'महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुजरातला प्रकल्प जाणे थांबले होते. त्यामुळेच मोदी-शाह यांनी EDचा वापर करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडून गुजरातच्या तालावर नाचणाऱ्या कळसूत्री बाहुल्यांचे सरकार आणले आहे. या सरकारच्या काळात वेदांता फॉक्सकॉनचा २ लाख कोटी रूपयांचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. बल्क ड्रग पार्क प्रकल्पही राज्याबाहेर गेला. त्यानंतर आता टाटा एअरबसचा २२ हजार कोटी रूपयांचा प्रकल्पही गुजरातला गेला'.

'राज्यात सरकार बदलल्यापासून तीन महिन्यात तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. काही दिवसांपूर्वी टाटा एअरबसचा प्रकल्प राज्यात येणार म्हणून जाहीरपणे सांगणारे राज्याचे उद्योगमंत्री आता निर्लज्जपणे हा प्रकल्प मागील सरकारमुळे राज्याबाहेर गेला असे सांगत आहेत. उदय सामंत हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत की गुजरातचे ? असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे', असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule : धुळ्यातील शिंदखेडामध्ये भाजपला मोठा धक्का! अजित पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार विजयी

Maharashtra Nagar Palika Election Result Live : पुणे जिल्ह्यात अजित पवारांना धक्का; जुन्नर, राजगुरुनगर, चाकणमध्ये शिंदेसेनेचं वर्चस्व

Piyush Mishra: शराब, शबाब और बेवफाई...; पियुष मिश्रा यांना पत्नीची दिला धोका, स्वत: कबुल करत म्हणाले...

Belly Fat Loss: जेवणानंतर ही ४ कामं करा, पोटाची चरबी होईल झटक्यात कमी

Suhas Kande Politics: नांदगावमध्ये शिंदेंचे आमदार सुहास कांदेंनी गड राखला; राष्ट्रवादीचा धुव्वा तर भाजपचा सुपडा साफ

SCROLL FOR NEXT